शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेट्ये-सामंत यांच्यातच खरी लढत

By admin | Updated: January 4, 2016 00:29 IST

रत्नागिरी पालिका पोटनिवडणूक : तिन्ही पक्षांकडून विजयाचा दावा

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ (अ)मध्ये १० जानेवारीला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला अधिकच गती आली आहे. शिवसेनेतर्फे आमदार उदय सामंत, भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश शेट्ये हेसुध्दा केतन शेट्ये यांचा जोरदार प्रचार करीत आहेत. सेना, भाजप व राष्ट्रवादी या तीनही पक्षांकडून आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मतदारराजा कोणाला साथ देणार, हे येत्या १० जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे. रत्नागिरीतील एका जागेसाठी होणारी ही पोटनिवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. सेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या उमेश शेट्ये यांचे २०१६ मध्ये होणाऱ्या रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न असल्याने त्यांना या पोटनिवडणुकीतच धोबीपछाड देण्याचे जोरदार प्रयत्न सेना आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरीत सुरू आहेत. त्यामुळेच आमदार सामंत हे स्वत: निवडणूक प्रचारात उतरले आहेत. वर्षभर उरलेल्या सत्ताकाळात पालिकेवर अधिक नगरसेवकांचे बळ प्राप्त करून वर्चस्व ठेवण्याचा चंग सेनेने बांधला आहे, तर सेनेचे हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये यांनी डावपेच आखले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उमेश शेट्ये यांच्यावर २०१६च्या पालिका निवडणुकीची जबाबदारी पक्ष सोपविणार असल्याचे सांगितले आहे. तसेच २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत उमेश शेट्ये यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे राजकीय कारणांवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)भाजपचेही तगडे आव्हानसेना-राष्ट्रवादीत जोरदार घमासान सुरू असतानाच भाजपनेही उमेश कुळकर्णी यांच्या रुपाने चांगला चेहरा जनतेसमोर आणला आहे. भाजप - सेनेची युती नसली तरी शहरात भाजपचा असा मतदारवर्ग आहे. त्यामुळे भाजपने नियोजनबध्द प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील लढत ही तिरंगी बनली आहे. सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजपनेही तगडे आव्हान निर्माण केले आहे.