शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

परवडत नसल्याने केवळ ७६ प्रस्ताव

By admin | Updated: March 25, 2017 21:41 IST

ठिबक सिंचन योजना : कोरडवाहू शेतीमुळे खर्च आवाक्याबाहेर; अकरा लाख अनुदान

मेहरून नाकाडे-- रत्नागिरी  --पावसाळ्यानंतरच्या प्रखर ऊन्हात कलमे जगविण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नव्हते. अशावेळी शासनाकडून ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. गतवर्षीपासून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. यावर्षी या योजनेंतर्गत ७६ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली असून, ११ लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. परंतु, कोरडवाहू शेतीमुळे ठिबक सिंचनचा खर्च परवडेनासा झाला आहे. पाणवठ्याजवळ असणाऱ्या बागांना पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मात्र, पाण्याअभावी कातळावरील लागवडीचा प्रश्न होता. ही झाडे जगत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आर्थिक डोलारा पेलून शेतकऱ्यांनी बागांची निर्मिती केल्यानंतर या बागांना पाणीच मिळत नसल्याने नुकसानाला सामोरे जावे लागत होते. त्यावर शासनाने मार्ग काढून विहीर असलेल्या फळबागांसाठी ठिबक, तुषार सिंचन योजना अनुदानावर उपलब्ध करून दिली. गतवर्षीपासूून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. गतवर्षी आॅनलाईनद्वारे अर्ज सादर करण्यासाठी केवळ एक महिना वेळ देण्यात आली होती. त्यासाठी दि. ६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या काळात आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात होते. मात्र, शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करणे जमले नाही. शिवाय एक महिनाच वेळ असल्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातून एकही अर्ज या योजनेसाठी आला नव्हता. यावर्षी मात्र आॅनलाईनद्वारे ७६ अर्ज शेतकऱ्यांनी पाठवल्यामुळे त्यांना मान्यता देण्यात आली. यासाठी ११ लाख रूपयांचे अनुदानही शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले.मात्र, डोंगरउताराच्या जागेमुळे विहिरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अंतर जास्त असल्याने पाणी नेण्यासाठी पाईपचा खर्चही वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांचा या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. डोंगराळ भागात ठिबक सिंचन बसवणे फायदेशीर असले, तरी डोंगराळ भागात यासाठी अतिरिक्त खर्च होत असल्याने तो परवडत नाही. या योजनेंतर्गत सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व महिला शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. मात्र, ठिबक यंत्रणा बसविण्याचे प्रमाण ठरलेले असल्याने ही बाब अधिक खर्चिक बनली आहे. नारळ, आंबा, काजू आदी फळबागा तसेच याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या आंतरपिकाला ठिबक पध्दतीने पाणी देणे सोपे होते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. सध्या पावसाळ्यानंतरही भाजीपाला तसेच फळभाज्यांची शेती केली जाते. बागायतीमधूनही आंतरपीक घेतल्याने ठिबक योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.फलोत्पादन जिल्हा : डोंगरासह, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडरत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर येथील फळबाग लागवडीस चालना मिळाली. येथील डोंगरावर, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करण्यात आली. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा हा डोंगरदऱ्यांतून विभागलेला आहे. डोंगरउताराची जागा असल्याने या जागेची निगा राखण्यासाठी भरपूर खर्च असल्याने बँकेचे अर्थसहाय्य घेऊन शासनाच्या विविध अनुदानांचा लाभ घेत कलमबागा विकसित केल्या जातात. यामध्ये रस्त्यालगत, पाणवठ्यालगत असलेल्या क्षेत्रांना पाण्याची समस्या उद्भवली नाही. मात्र, कातळावरील बागांसाठी ठिबक सिंचन योजना अंमलात आणण्यात आली.