शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ओसरगाव अपघातात एक ठार

By admin | Updated: February 15, 2015 00:37 IST

दहा जखमी-एक गंभीर : झायलो-डंपरची समोरासमोर धडक

कणकवली : महामार्गावर ओसरगांव कानसळीवाडी येथे शनिवारी दुपारी झायलो-डंपर अपघातात एक जागीच ठार झाला. तर चार प्रवासी जखमी झाले. जखमींना ओरोस येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कपिल दशरथ पाटील (३५, रा.नालासोपारा, पालघर) यांनी दिली. याबाबत वृत्त असे की, कपिल पाटील आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांसह वसई येथून गोव्याला झायलो (एम.एच.४८-पी-४८१३) आणि अन्य एका वाहनातून फिरायला जात होते. दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास ओसरगांव येथे महिला भवननजीक समोरून येणाऱ्या डंपरला (एम.एच.-०७-सी ६४३६) झायलो गाडीची धडक बसली. यात कार चालक हितेश दिनकर पाटील (वय २८, रा. आगाशी, विरार पूर्व, जिल्हा पालघर) हा जागीच ठार झाला. तर मनोज यशवंत ठाकूर (सफाळे, नगावे, पालघर), यशवंत रामचंद्र ठाकूर, निर्मला यशवंत ठाकूर, अर्पणा मनोज ठाकूर, हर्षदा शशिकांत पाटील, कुणाल शशिकांत पाटील, वृषाली दिलीप घरत, तृप्ती मनोज ठाकूर, मानसी मनोज ठाकूर (सर्व रा. पालघर) हे जखमी झाले. यातील मानसी ठाकूर या गंभीर जखमी असल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. चालक हितेश पाटील हा अपघात झाल्यानंतर गाडीतच अडकून पडला होता. स्थानिकांनी त्याला गाडीच्या बाहेर काढले. अपघातात खडी भरून नेणारा डंपरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला. डंपरचालक संजय रामचंद्र जाधव (४०, रा.घोणसरी, कणकवली) हा जखमी झाला. कारमधील जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डंपरचालकास उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपनिरीक्षक संतोष वालावलकर तपास करत आहेत. (प्रतिनिधी)