शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मळगावात दीड दिवसाची नागपूजा

By admin | Updated: August 18, 2015 23:39 IST

श्रावणातील पहिला सण : गोसावी कुटुंबियांची २०० वर्षांची परंपरा

राजन वर्धन- सावंतवाडी -एक दिवसाचा, दीड दिवसाचा, तीन दिवसाचा, पाच दिवसाचा गणपती उत्सव आपण पाहिला आहे. पण बुधवारी साजरी होणारी नागपंचमी बहुधा एक दिवसाचीच असते. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे दीड दिवसाची नागपंचमी गेली दोनशे वर्षे अखंड सुरू आहे. गोसावी कुटुंबियांमार्फत सुरू असणारी ही नागपंचमी तालुक्यात चर्चेचा विषय बनून राहिली आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला महत्त्वाचे स्थान आहे. पांरपरिकसण, उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेम निर्माण करणाऱ्या सणातील महत्त्वाचा सण म्हणूनही याकडे पाहिले जाते. नागपंचमी दिवशीपूर्वी महिला रानावनात जाऊन वारुळाजवळ जाऊन तेथे नागदेवतेची पूजा करत असत. यावेळी दुध, पातोळे असे पदार्थ नागराजासमोर ठेवून त्याला माया लावली जात असे. यातून महिला नागाला आपला भाऊ मानून त्याला वंदन करायच्या. यातून नाग व माणूस याचे एक प्रेमाचे नाते निर्माण झाले. पण या सापांना पकडून गारूडी खेळ करून पैसा मिळवून आपला उदरनिर्वाह करत. या खेळाला तस्करीने ग्रासले व सापाच्या विषाची विक्री होऊ लागली. त्यातूनच ही वारूळे कमी झाली आणि घरोघरी मातीच्या नाग मूर्तींची पूजा होऊ लागली. ती आजपर्यंत सुरू आहे. नागपंचमी दिवशी नागाची मूर्ती आणून तिला लाह्या चिकटवून दुधाचा व पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास त्याचे विसर्जन करण्यात येते. वडिलोपार्जित आलेल्या या परंपरेचा मान यावर्षी रामचंद्र बंडू गोसावी यांना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गोसावी व धर्मनाथ गोसावी बंधू नागपंचमीची तयारी करत आहेत. या अनोख्या उत्सवाची जपणूक करताना नागमूर्तीची सजावट आकर्षक केली जाते. त्यादिवशी देखावाही केला जातो. शिवाय रात्री झिम्मा फुगडी, महिलांची पांरपरिक समूह गीते यांचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे येथील नागपंचमी उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेकजण भेट देतात. नागपंचमी दिवशीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन, एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमी दिवशी सकाळी नागाची मूर्ती आणून सजवली जाते. यावेळी चाफी, दुर्वा, बेल यांचा वापर केला जातो. त्यानंतर विधीवत पूजा करताना दुध व लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. दुपारी पातोळ्यांचा नैवेद्य दिला जातो. तर सायंकाळी पुन्हा सर्वांच्या उपस्थितीत पूजा करून रात्री उशिरापर्यंत झिम्मा-फुगड्या, समूह गीतांचा महिलांचा कार्यक्रम साजरा केला जातो. यानंतर भजन-अभंगांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी तुपातील करंज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी सवाद्य मिरवणूक व फटाक्यांच्या आतषबाजीत अळवाच्या पानात विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटला जातो. भावनिक वातावरणात विसर्जन केल्यानंतर घरातील महिला गहिवरतात.