एजाज पटेल - फुणगूस -विंचू चावला, काय करु मी, या भारुड्याची ३३ जणांना आठवण झाली आहे. हे फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोंदीवरून समजते. तर गतवर्षीही ३३ जणांना विंचू चावल्याची आकडेवारी आहे, तर गेल्या दोन वर्षात २३ जणांना सर्पदंश, तर ३२ जणांना श्वानदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, वेळीच झालेल्या उपचारामुळे कोणीही दगावल्याची घटना नाही. ग्रामीण भागात विषारी असे विंचू मोठ्या प्रमाणात आढळतात. काही भागात तर अत्यंत विषारी असे विंचू आहेत. विंचू चावल्यानंतर काही सेकंदातच हे विष शरीरात भिनते. यामुळे चावलेल्या व्यक्तिला मरणयातना सोसाव्या लागतात. विंचू चावल्यानंतर वैद्यकीय इलाज करणे गरजेचे बनते. मात्र, अजूनही ग्रामीण भागात काही वनस्पतींचा आधार घेत विंचूचे विष शरीरातून काढले जाते. गेल्या दोन वर्षात खाडी भागात विंचवांनी चांगलेच सतावले आहे. मार्च २०१२ ते एप्रिल २०१३ मध्ये ३३ जणांना विंचूदंश झाला आहे. सन १३-२0१४ मध्येही ३३ जणांना विंचूदंश झाल्याची नोंद आरोग्य केंद्रात आहे. तसेच सन २0१२-२0१३मध्ये १४ जणांना सर्पदंश, तर २0१३-२0१४ मध्ये ९ जणांना सर्पदंश, तर सन २0१२-२0१३मध्ये १६ जणांना श्वानदंश, तर २0१३-२0१४ मध्ये १७ जणांना श्वान दंश झाल्याची नोंद आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या दंश रुग्णांवर वेळीच उपचार झाल्याने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. हे नशीबच म्हणावे लागेल.विंचू चावल्याची वाढती संख्या पाहता यावर काही तरी उपाययोजना करणे गरजेचे बनले असले तरी सध्या तर विंचू हा फुणगूस खाडीवासीयांना डोकेदुखीचा विषय ठरला आहे. जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागर व संगमेश्वर देवरूख पट्ट्यात विंचू व सर्पदंशाचे प्रकार वाढत असतात. यावर लस देण्यात येते. काही ठिकाणी तत्काळ ही लस उपलब्ध होते, तर बहुतांश ठिकाणी बरेच दिवस याची वाट पाहावी लागते. मात्र, जिल्ह्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात किंवा जवळच्या दवाखान्यात अशा स्वरूपाची लस ठेवावी, अशी मागणी केली जात आहे. फुणगूस परिसरात मागील वर्षात सर्पदंश रूग्णांची संख्या २३.श्वानदंशाचे ३२ प्रकार घडले. मात्र, यात कोणीही दगावला नाही,कोकण आणि विंचू यांचे नाते जवळचे आहे. या हंगामात गतवर्षी विंचूदंशाचे ३३ रूग्ण.दोन वर्षात विंचूदंश झालेल्या रूग्णांची संख्या ३३च वनस्पती औषधांचा आधार.
अगं.. गगं...गगं विंचू चावला, विंचू चावला
By admin | Updated: November 7, 2014 23:32 IST