शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

हानीचा आकडा तीन कोटींच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 00:17 IST

नैसर्गिक आपत्तीत दोघांचा मृत्यू : २४२ घरे, २५ गोठ्यांची पडझड, मदत मात्र तुटपुंजी

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ३ कोटी १५ लाख एवढ्या नुकसानीसह दोन व्यक्ती मृत झाल्याचे प्रशासनाकडे नोंद झाली आहे. नुकसानीमध्ये २४२ घरांची तर २५ गोठ्यांची पडझड झाली आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत १२ लाख ५ हजार रुपयांची मदत संंबंधितांना करण्यात आली आहे. नुकसानीचा आकडा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमालीचा पाऊस पडतो. पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी कोट्यवधीची नुकसानी होत असते. तसेच मनुष्यहानी देखील होते. शासकीय निकषात बसणाऱ्या नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून मदतही दिली जाते. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रशासनाला नेहमी सतर्क रहावे लागते. कधी कुठे काही आपत्ती उद्भवेल याचा काही नेम नसतो. ८ जूनपासून सिंधुदुर्गात मान्सूनला सुरुवात झाली. पेरणीयोग्य पुरेसा पाऊस सुरुवातीला पडला. नंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. या दरम्यानपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शासकीय व खासगी मालमत्तेचे ५ ते ६ लाखांपर्यंत नुकसान झाले होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरात पडलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत करून टाकले. यात घरांची पडझड, गोठ्यांचे नुकसान, वीज खांब उन्मळून पडणे, झाडे विद्युत तारांवर उन्मळून पडणे यामुळे अद्यापपर्यंत ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे. २४२ घरांची पडझड; ३ कोटी ३ लाख नुकसानीजिल्ह्यात २४२ घरांची पडझड झाली असून त्याचे एकूण ३ कोटी ३ लाख ५० हजार ३०६ रुपये एवढे नुकसान झाले आहे. झालेल्या एकूण नुकसानीत घरांची पडझड होऊन झालेली नुकसानी ही जास्त आहे. वादळी वाऱ्यांचा फटका याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.प्रथमच एवढी मोठी नुकसानी?जूनच्या एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत तब्बल ३ कोटी १५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही जाणकारांच्या मते गेल्या पाच ते सहा वर्षात एका महिन्यात एवढी मोठी नुकसानी आपण बघितली नसल्याचे त्यांनी सांगितले. १२ लाख, ५ हजारांची नुकसान भरपाईनैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या तुलनेत नुकसान भरपाई मात्र १२ लाख ५ हजार ३३ रुपये एवढी करण्यात आली आहे. यात वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या गावडे व वरक यांच्या नातेवाईकांना शासनामार्फत ५ लाख ५० हजार एवढी मदत देण्यात आली आहे. तर घराची पडझड झालेल्या ९५ जणांना २ लाख ५० हजार ८०३ रुपये तर गोठ्यांची पडझड झालेल्या १० जणांना २३ हजार रुपये अशी मदत देण्यात आली आहे. या दरम्यान २ जनावरे मृत झाल्याने त्यांच्या मालकांना ४० हजार रुपये एवढी मदत देण्यात आली आहे.