शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

लक्षवेधी शोधमोहीम...लक्ष्य नसलेली... अंत नसलेली!

By admin | Updated: August 7, 2016 01:01 IST

महाड दुर्घटना : निश्चित आकडेवारीच नाही, मध्यरात्रीच्या दुर्घटनेमुळे ‘बेपत्तां’चे आकडे अधांतरी

विहार तेंडुलकर -- रत्नागिरी --महाड येथील दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध चौथ्या दिवशीही सुरुच आहे. अद्यापही अनेक लोक बेपत्ता आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने किती वाहने आणि किती लोक बेपत्ता झाले आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही. प्रशासनाकडे असलेल्या बेपत्ता लोकांच्या यादीवरून ढोबळ मनाने ४८ लोक या दुर्घटनेत बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. २००९ साली झालेल्या फयान वादळानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेतही अशीच स्थिती उद्भवली होती. त्यामुळे महाडचे रेस्क्यू आॅपरेशन कोणतेही ‘लक्ष्य’ नसल्यामुळे कधी थांबवणार? याबाबत अजूनही द्विधाच स्थिती आहे.महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याला आता चार दिवस उलटले आहेत. आत्तापर्यंत केवळ २५ मृतदेह सापडले आहेत. उर्वरितांचा शोध सुरु आहे. रेस्क्यू आॅपरेशनसाठी आलेल्या सर्व टीम या महाड परिसरातच शोध मोहीम राबवत आहे. दुसरीकडे मंडणगड, दापोली परिसरातील किनारपट्टीच्या गावांना शोध मोहिमेबाबत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सध्याच्या घडीला या दुर्घटनेत एकूण ४८ लोक बेपत्ता झाल्याची प्रशासनाकडे माहिती आहे. त्यापैकी २५ जणांचे मृतदेह शनिवारी सायंकाळपर्यंत मिळाले आहेत. उर्वरितांचा शोध सुरु आहे. मात्र, या दुर्घटनेत आणखी एक कार गायब झाल्याची माहिती शुक्रवारी हाती आली. त्यामुळे आत्तापर्यंत नेमकी किती वाहने या दुर्घटनेची शिकार झाली, त्याचा केवळ अंदाज बांधणेच प्रशासनाच्या हाती आहे.नेमकी रात्रीची घटना घडल्याने किती वाहने या पुराच्या पाण्यात वाहून गेली, याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. मंडणगडमध्ये मृतदेह सापडू लागल्यानंतर याठिकाणी शनिवारी एक टीम दाखल झाली तर एनसीआरएफच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. मात्र, केवळ स्थानिक लोकच मृतदेह गोळा करण्याचे काम करत आहेत. या साऱ्या गडबडीत आणखी किती काळ रेस्क्यू आॅपरेशन चालणार आणि किती जणांचा शोध घेतला जाणार? याबाबत शासनाकडून अजूनतरी उत्तर नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या दोन बस, तवेरा गाडी यांचा शोध लागल्यावर हे आॅपरेशन थांबविण्यात येणार असल्याची माहिती सध्यातरी मिळत आहे.फयान अन् महाडची दुर्र्घटना३६ वर्षानंतर नोव्हेंबर २००९मध्ये झालेल्या फयानसारख्या चक्रीवादळात अनेक मच्छीमार बेपत्ता झाले होते. या चक्रीवादळात २६ खलाशी मृत पावल्याचा आकडा होता. वादळाच्या कचाट्यात ३२ नौका सापडल्या होत्या. त्यापैकी केवळ तीन नौका किनारी परतल्या. उर्वरित नौकांची मोडतोड झाली, काही फुटल्या. २३० खलाशांना याचा फटका बसला. त्यातील ३९ खलाशी अनेक महिने झाले तरी बेपत्ताच होते. १६५ खलाशी सुखरुप होते तर २६ मृत झाले. प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रारींवरुन हा आकडा कमीजास्त होत होता. महाड येथील दुर्घटनेतही कुणी बेपत्ता झाल्याची खबर आल्यानंतर प्रशासनाकडील आकडेवारी ‘अपडेट’ होत आहे.अजूनही तर्कवितर्कचही घटना घडल्यानंतर तब्बल पाऊण तासांनी ती उघडकीस आली असावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पाऊण तासात अनेक वाहने या दुर्घटनेत बेपत्ता झालेली असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्षात कितीजण बेपत्ता झाले, याबाबत अजूनही तर्कवितर्कच लढविले जात आहेत.