शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधींचे जतन करण्याची गरज

By admin | Updated: June 28, 2015 23:24 IST

खोटलेत कार्यशाळा : कित्येक वनौषधींच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका

कडावल : कोकणातील रानावनात विविध वनौषधींचा खजिना ठासून भरला आहे. मात्र, अज्ञानामुळे कित्येक वनौषधींच्या प्रजाती कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनौषधी व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे संवर्धन होऊन मानवाला रोगमुक्त करण्यासाठी समाजधुरिणांसह प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे. कुडाळ तालुक्यातील खोटले येथे झालेल्या कार्यशाळेत वनौषधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.आजची पिढी विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींनी ग्रासली आहे. तिशीच्या आतील वयाच्या तरुणांमध्ये आज मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या घातक आजारांची लक्षणे दिसत आहेत. शहरी किंवा ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक घरापर्यंत या व्याधी पोहोचल्या आहेत. धकाधकीचे जीवन, रासायनिक खते व औषधांचा अंश असलेले अन्नधान्य, ताणतणाव तसेच इतरही अनेक कारणे यामागे आहेत. असंख्य रोगांचा सामना करण्यासाठी आज लोक अ‍ॅलोपॅथिक औषधांचा सर्रास वापर करीत आहेत. मात्र, या औषधांच्या दुष्परिणामांमुळे विकतचे दुखणे घेतल्याची परिस्थिती अनेकांवर ओढवत असल्याचे चित्र दिसते. या भयाण वास्तवापासून भारतीय चिकित्सा व उपचार पद्धतीचा मानबिंंदू असलेला आयुर्वेद रुग्णांची सहीसलामत सुटका करू शकतो आणि औषधी गुणधर्म असलेली विविध वृक्षसंपदा कोकणच्या रानावनात सुदैवाने अगदी ठासून भरली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अशा विविध वनस्पती आहेत, की ज्यांपासून अनेक व्याधींवर उच्च प्रतीची आयुर्वेदिक औषधे निर्माण होऊ शकतात. आवळा, एरंड, कुडा, गुळवेल, दारू हळद, आंबे हळद, नागकेशर, बेहडा, हरडा, बेल, ऐन, सातिवन, गरूडवेल तसेच इतर शेकडो वनौषधींनी येथील जंगले समृद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील सद्गुरू भक्तसेवा न्यासच्यावतीने खोटले येथे वनौषधे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राबविण्यात आलेल्या वनौषधी शोध मोहिमेत तेथील जंगल परिसरात सुमारे दोनशेहून अधिक वनौषधी आढळून आल्या. यावरून कोकणातील इतर भागातील विस्तीर्ण जंगलांमध्ये किती प्रमाणात उपयुक्त वनस्पती असतील, याची सहज कल्पना येते. हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी आयुर्वेदातील धुरिणांसह सुजाण नागरिकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्त्वाचे स्थान आहे. या उपचार पद्धतीमुळे कुठल्याही आजारावर शाश्वत उपचार करता येणे शक्य आहे. मात्र, आजच्या पिढीला वनौषधींचे ज्ञान नसल्याने ही सहजसोपी उपचार पद्धती मागे पडली आहे. या अज्ञानामुळेच कित्येक वनौषधींच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनौषधी व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे संवर्धन होऊन मानवाला रोगमुक्त करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचीही नितांत गरज आहे. (वार्ताहर)