शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा

By admin | Updated: August 13, 2014 23:31 IST

रत्नागिरीत पक्षश्रेष्ठींची भेट; देवगडमधील बैठकीतही कार्यकर्ते आग्रही

वैभववाडी : गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिला गेलेला कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघ पूर्ववत राष्ट्रवादीलाच मिळावा, अशी मागणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पूर्वीचा देवगड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाची पुर्नरचना होऊन कणकवली-देवगड-वैभववाडी असा मतदारसंघ तयार झाला. परंतु काँग्रेसने या मतदारसंघाचा आग्रह गेल्या निवडणुकीत धरला. त्याचवेळी राष्ट्रवादीला सावंतवाडी मतदारसंघ हवा होता. त्यामुळे दोन्ही पक्षांची सोय करण्याच्या उद्देशाने मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आली होती. परंतु काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघात पराभूत झाल्याने परंपरागत मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे, माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, आप्पा अनभवणे, विनायक जोईल, प्रफुल्ल सुद्रीक, अजय चिके, संभाजी रावराणे, बंटी कदम, सुधीर मांजरेकर, महेश रावराणे, चंदू परब, अविनाश सापळे, रंजन चिके, संतोष बोडके आदींनी सोमवारी रत्नागिरीत पक्षनेतृत्वाची भेट घेऊन मतदारसंघावर दावा केला. त्याचवेळी गेल्या २ वर्षापासून काँग्रेस सातत्याने सावंतवाडी मतदारसंघावर दावा करीत असल्याचे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले. माजी आमदार केसरकर पक्ष सोडून गेल्याने त्यांच्यासमवेत त्या मतदारसंघातील बहुतांश कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मात्र कणकवली मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पक्षातच थांबल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची स्थिती अधिक चांगली असल्याचे या कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाला पटवून दिले आहे. त्यामुळे याबाबत आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)