शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

नाथ पै यांचे विचार प्रगतीकडे नेणार

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

बाळासाहेब पाटणकर : जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणे

कुडाळ : बॅ. नाथ पै यांचे विचार प्रगतीच्या मार्गावर नेणारे आहेत. त्यामुळे नाथ पैंच्या विचारांचा माणूस निर्माण करूया, असे उद्गार बॅ. नाथ पै यांचे सहकारी ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते बाळासाहेब पाटणकर यांनी काढले. येथील बॅ. नाथ पै विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी लोकसेवा संघाचे अध्यक्ष तसेच वर्ध्याच्या सेवाग्रामचे अध्यक्ष, जमनालाल बजाज पुरस्कारप्राप्त जयवंत मठकर होते. यावेळी बाळासाहेब पाटणकर यांनी बॅ. नाथ पै यांचे कार्य तरुणांसमोर प्रतिपादन केले. वेतोरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर नाईक, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते कै. भाऊसाहेब धडाम स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले. या स्पर्धेत नववी ते बारावी गटात साईराज सुहास साळगावकर, शितल देवू बरागडे, अलिशा जॅकी फेराव यांनी प्रथम तीन, तर विनिता प्रशांत पांजरी हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. महाविद्यालयीन व खुल्या गटात कल्पना सच्चिदानंद ठुमरे, युक्ता प्रकाश नार्वेकर, भाग्यश्री दिलीप नर यांनी प्रथम तीन, तर रामचंद्र विठ्ठल राऊळ याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. प्रसाद धडाम यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच माजी विद्यार्थी बाबी दळवी, शिक्षक पी. सी. राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सुरेश येजरे यांनी आभार मानले. यावेळी उदय नाडकर्णी, बापू नेरूरकर, प्रभाकर वालावलकर, घनशाम वालावलकर, भाऊ पाटणकर, विठ्ठल पाटणकर, जयराम डिगसकर, सदानंद प्रभू, सुधीर पानवलकर आदी नाथ पै प्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)