शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नमो गुरूजींच्या तासांमुळे शिक्षकांची होणार धावपळ

By admin | Updated: September 4, 2014 23:20 IST

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विविध माध्यमाव्दारे थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विविध माध्यमाव्दारे थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्र पाठवून ३ हजार ६६० शाळेतील शिक्षकांना दुपारी ३ ते ३.४५ या वेळेत शाळेत हजर राहत रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून मोदी यांचे भाषण ऐकविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांची चांगलीच धावपळ होणार आहे. दरवर्षी पाच सप्टेंबरला जिल्हा परिषदेचा शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम होत असतो. याच दिवशी गावागावात शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडत असतो. या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत असते. मात्र, यंदा दुपारच्या सत्रात पंतप्रधान मोदी एकाच वेळी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याने शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सकाळी नगरजवळ होणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षकांना थेट नेमणुकीची शाळा गाठावी लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवावे लागणार आहे. हा कार्यक्रम सक्तीचा नसला तरी त्याचा अहवाल शिक्षण विभाग जमा करणार आहे. यामुळे शिक्षकांना शाळेत उपस्थित रहावेच लागणार आहे.जिल्ह्यात ३ हजार ६६० शाळा आहेत. या पैकी बहुतांशी काळात टिव्ही अथवा संगणक सुविधा उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी ही सुविधा नाही, त्या ठिकाणी रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)