शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात आणखी १०० शाळा धोकादायक

By admin | Updated: January 4, 2016 00:44 IST

जिल्हा परिषद : ३१ शाळांना मिळणार वर्गखोल्या

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १३१ प्राथमिक शाळा मोडकळीस आल्या असून, त्या धोकादायक स्थितीत आहेत. मोडकळीस आलेल्या शाळांपैकी ३१ शाळांच्या निर्लेखनानंतर त्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन वर्गखोल्याही मंजूर करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या १३१ इमारतींची स्थिती धोकादायक असून त्या कधीही कोसळतील, अशा अवस्थेत आहेत़ या शाळा कोसळून मोठी प्राणहानी होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ आतापर्यंत सर्वशिक्षा अभियानातून कोट्यवधी रुपये खर्चून शेकडो शाळांना नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, वर्गखोल्या बांधकामासाठी सर्वशिक्षा अभियानातून अनुदान देणे बंद झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा या जुन्या आहेत. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही शाळांत तर विद्यार्थी आणि शिक्षक जीव मुठीत धरून राहत आहेत.मोडकळीस आलेल्या १३१ शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आले होते़ यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या तालुक्यातून आलेले ४७ शाळांचे निर्लेखनाचे प्रस्ताव परिषद रत्नागिरी बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आले आहेत़. चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर या तालुक्यातील ८४ शाळांचे निर्लेखनाचे प्रस्ताव चिपळूण बांधकाम विभागाला निर्लेखनासाठी प्राप्त झाले होते. मोडकळीस आलेल्या ३१ प्राथमिक शाळांच्या इमारतींचे निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी काही शाळांचे निर्लेखनही करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित शाळांचे निर्लेखन कधी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. निर्लेखन मंजूर करण्यात आलेल्या शाळांसाठी वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून बांधकामांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित मोडकळीस आलेल्या १०० शाळांचे निर्लेखन करुन त्यांचे बांधकाम कधी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता जर या बांधकामाला सुरुवात झाली तर ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकते, असे म्हटले जात आहे. (शहर वार्ताहर)लक्ष द्यावे : शिक्षक-विद्यार्थ्यांचा जीव मुठीतशासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, विद्यार्थी जेथे शिक्षणाचे धडे घेत आहेत, त्याच इमारतींची दुरवस्था झाल्याने विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत धरुन शाळेत बसतात. त्यामुळे शासनाने मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष देऊन भविष्यात होणारी प्राणहानी व वित्तहानी टाळावी. पावसाळ्यात दुरुस्तीपावसाळा एक महिन्यावर आला की, शाळा दुरुस्तीचा विषय चर्चेत येतो. शिक्षण विभागाने आतापासूनच उर्वरित शाळांनाही निधी द्यावा आणि शाळांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.