शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी राज्यभरात एस. टी. सेवा बंद?

By admin | Updated: September 24, 2015 23:55 IST

कामगारांचे प्रश्न, समस्या मान्य करूनही त्या सोडविल्या जात नाहीत. म्हणूनच हे धरणे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसमधील चालक व वाहक यांच्या ८ तास कामाबाबत अजूनही नियोजन झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेले नसल्याने एस. टी.चे राज्यभरातील ७५ हजार कर्मचारी येत्या २८ सप्टेंबर २०१५ला स्थानक, डेपो याठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या धरणे आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.  रत्नागिरी येथे जिल्ह्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला चव्हाण व संघटनेचे अन्य पदाधिकारी आले होते. प्रथम टप्प्यात २८ सप्टेंबरला धरणे आंदोलन होणार असून, त्यादिवशी सर्व कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काम बंद राहून एस. टी. आगारातच उभ्या राहणार काय? असे पत्रकारांनी विचारले असता सर्व कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहोत, त्यामुळे काय स्थिती निर्माण होईल, हे आता सांगता येणार नाही. चव्हाण यांच्या या उत्तरामुळे राज्यभरातील एस. टी. बस सेवा पूर्णत: विस्कळीत होणार असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात व राज्याच्या अनेक भागात अधिकाऱ्यांमार्फत चुकीच्या पध्दतीने गाड्यांचे वेळापत्रक तयार करण्यात येते, असा आरोप त्यांनी केला. चालक, वाहकांच्या कामाचे तास किती, याबाबतच्या नियमांचे पालनच होत नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या सोडल्या जात नाहीत. विभागीय कार्यालयात बसून कोणीतरी अधिकारी त्यांना वाटेल त्या पध्दतीने गाड्यांचे मार्ग ठरवून वेळापत्रक तयार करतात, त्यावेळी प्रवाशांच्या मागणीचाही विचार केला जात नाही, असा आरोप त्यांनी केला. गाडीसाठी आवश्यक वेळेची नोंद न करता वेळ कमी दाखवली जाते व किलोमीटर्स वाढवून दाखवले जातात. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काही अधिकारी आपली पाठ थोपटून घेतात. प्रवाशांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या आवश्यक आहेत. कामगारांचे प्रश्न, समस्या मान्य करूनही त्या सोडविल्या जात नाहीत. म्हणूनच हे धरणे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. एस. टी.च्या १ लाख कामगारांपैकी एस. टी. कामगार संघटनेचे राज्यात ७५ हजार कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर राज्यभर बंद आंदोलन व नंतर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)प्रवासात अकराशे कोटींची सवलतराज्य परिवहनतर्फे राज्यातील २५ दुर्बल घटकांना प्रवासात प्रतिवर्षी ११०० कोटींची सवलत दिली जात आहे. मात्र, हे सवलतीचे पैसे संबंधित खात्याकडून एस. टी.ला मिळत नाहीत. विद्यार्थी पास, मोफत प्रवास तसेच ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी प्रत्येकी ३६५ कोटींची सवलत दिली जाते. संबंधित खात्यांकडून हे पैसे मिळत नसल्याने नुकसान होत आहे.बस थांबत नाहीत...रत्नागिरी तालुक्यातील धावणाऱ्या काही एस.टी.बसेस रिकाम्या असतानाही मधल्या थांब्यांवर थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते व एस.टी.चेही नुकसान होते. रत्नागिरी रेल्वे फाट्यावर असे प्रकार सातत्याने घडत असून त्याबाबत संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे असे विचारता चव्हाण म्हणाले, असे होत असेल तर ते चुकीचेच असल्याचे त्यांनी सांगितले.