शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मनसेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 19, 2015 23:49 IST

केंद्र, राज्यशासनाचा निषेध : वाढत्या महागाईवरून टीकाटिप्पणी

ओरोस : केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील युती सरकार महागाई कमी करण्याच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करत आहे. महागाई गगनाना भिडली असून विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांचे या थापाड्या सरकारला सोयरसुतक नाही. वाढीव महागाई आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडले.सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईला आळा घालण्यात अपयशी सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी धीरज परब, महिला अध्यक्षा भारती रावराणे, चैताली भेंडे, श्रेया देसाई, दत्ताराम गावकर, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक, अशोक रावराणे, बाळा पावसकर, माधवी दळवी, सुवर्णा मुंज यांच्यासह मनसे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष संदेश परब, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारने महागाई कमी करण्याचे सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिले होते. परंतु पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यात व्यस्त असून सामान्य जनतेकडे बघायला त्यांना वेळ नाही.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महागाईविरोधात आंदोलने छेडत आहेत. आम्ही तुम्हांला अच्छे दिन दाखविणार आहोत अशाप्रकारे वल्गना करणारे फक्त मोदी हे विदेश दौऱ्यावर आपल्या जेवणाच्या मोठ्या मेजवान्या घेत आहेत. गरीब जनता महागाईने होरपळली आहे. जतनेला दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. तूरडाळीचा दर २०० रुपयांपर्यंत पोहोचला असून तांदुळ ४० ते ८० रुपये व अन्य भाजीपाला, कांदे, बटाटे १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असे धीरज परब म्हणाले. यावेळी भारती रावराणे, धीरज परब, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक यांनी विचार मांडले. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन महागाईविरोधात शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)चैताली भेंडे : शासन जनतेची पिळवणूक करतेययावेळी महिला जिल्हाध्यक्ष चैताली भेंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महागाई विरोधी आंदोलन उभारले असून महागाई कमी होईपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असे सांगितले. काँग्रेस सत्तेवर असताना महागाई व विकासाचे गाजर दाखवणाऱ्या मोदींच्या हाती केंद्रातील सत्ता जनतेने दिली. परंतु मोदी विदेश दौऱ्यात व्यस्त आहेत. भारतातील जनतेकडे पहायला त्यांना वेळ नाही. सामान्य जनतेला डाळ, भात व जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सरकार जनतेची पिळवणूक करत आहे.गरीबाच्या तोंडाचा घास काढून घेणाऱ्या आणि महागाई कमी करण्याच्या आश्वासनांनी जनता हैराण झाली असून आता या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. थापा मारणारे आणि विकासाला खीळ घालणारे सरकार आहे. जनतेने जागृत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केले. महागाई कमी करण्याचे थापा मारत पंचपक्वांने खाण्यात दंग असलेले सरकार गरीबांकडे लक्ष देत नाही. सामान्य जनतेची सरकारला काही चिंता नाही, असा आरोप त्यांनी केला.