शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटीच्या विकासनिधीला मंत्र्यांचा लगाम

By admin | Updated: May 27, 2014 01:18 IST

वित्त सभेत ठराव : ‘तो’ निधी सदस्यांनी सुचविलेल्याच कामावर खर्च करावा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या ५० मतदारसंघातील विकासासाठी यावर्षी ठेवण्यात आलेल्या ३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी एका पत्राद्वारे लगाम घातला आहे. मात्र मंत्र्यांचे पत्र म्हणजे शासन निर्णय नाही. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघात विकास निधीची आवश्यकता असते. त्यामुळे तो निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीनुसारच खर्च व्हावा अशी मागणी वित्त समिती सभेत सदस्यांनी केली. तीन कोटी हा विकास निधी जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्याच कामावर खर्च करावा असा ठरावही यावेळी करण्यात आला. त्यामुळे या विषयावर सभागृहात चांगलीच गरमागरम चर्चा झाली. जिल्हा परिषद वित्त समितीची सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती भगवान फाटक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्य सुरेश ढवळ, रणजित देसाई, वित्त अधिकारी मारुती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. चार वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सदस्यांना आपल्या मतदारसंघात विकासकामे करता यावीत म्हणून जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातून विकासनिधी उपलब्ध करून दिला. यावर्षी सन २०१४-१५ या वर्षात ३ कोटी निधी उपलब्ध करून ेदेण्यात आला आहे. मात्र हा निधी यासाठी खर्च करू नये असे पत्र ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाला पाठविले आहे. हा विकास निधी समतोल खर्च होत नाही तसेच समाजकल्याण, महिला बालविकास व पाणीपुरवठा विभागालाही कमी निधी मिळू शकतो. या कारणास्तव त्यांनी हे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले आहे. त्याला सदस्य रणजित देसाई व सुरेश ढवळ यांनी आक्षेप घेत हा शासन निर्णय नाही, अध्यक्षांनासुद्धा राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांचेही आदेश महत्वाचे आहेत. हा विषय येत्या जिल्हा परिषद सभागृहासमोर ठेवा. मात्र हा निधी सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्या कामावर खर्च व्हावा असा ठरावही मंजूर करण्यात आला. मार्च अखेर सन २०१३-१४ चा खर्च हा शिक्षण विभागाचा ७८ टक्के, सामान्य प्रशासन ६४ टक्के, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ८९ टक्के, कृषी विभाग १०० टक्के, पशुसंवर्धन विभाग ७७ टक्के, १३ वा वित्त आयोग ९६ टक्के, ग्रामपंचायत विभाग ९९ टक्के, समाजकल्याण ९७ टक्के, महिला व बालविकास ८३ टक्के असा खर्च झाला असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)