शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमहाबळेश्वर पाणीटंचाईच्या खाईत

By admin | Updated: February 3, 2015 23:54 IST

तहान भागेना : ५७ गावे, १२२ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश, नादुरुस्त योजनांबद्दल उपाययोजना नाही

शिवाजी गोरे - दापोली --कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा योग्य नियोजन होत नसल्याने, पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हिवाळा संपताच पाणी पातळी खालावते व जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवायला लागते. कोकणच्या मिनीमहाबळेश्वरला सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दापोली तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार झाला आहे. ५७ गावे, १२२ वाड्यांचा पाणी टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.दापोली तालुक्यात टंचाई आराखड्याने उग्र रूप धारण केले असून ५७ गावे, १२२ वाड्यात फेब्रुवारीपासूनच टंचाईच्या आराखड्यावर येणार आहेत. तालुक्यातील खेर्डी-कातळवाडी, विसापूर-खातलोली, बौद्धवाडी, मांदिवली-बाईतवाडी, कवडोली-गावठाणवाडी, आतगाव-गावठाणवाडी, भाटवाडी, उटंबर-कोळीवाडा, चिंचवळ आघारी-तिवरे रहाटवाडी, ओणी-मधलीवचाडी, वरवटकरवाडी, वरवटकरवाडी नं.२, जामगे-देवाचा डोंगर, नवानगर, मुर्डी-चाचवलवाडी, तामसतीर्थ-भंडारवाडा-कोळीवाडा, करजगाव-मधलीवाडी, मुकादमवाडी, चिपळूणकरवाडी, भाटी-पूर्ववाडी, पश्चिमवाडी, भोईवाडा, उन्हवरे-गणेशवाडी, फरारे-मोगरेवाडी या ११ गावे १८ वाड्यांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. या गावांना उन्हाळ्यात दरवर्षी आपली तहान टँकरमधून मिळणाऱ्या चार हंडे पाण्यावर भागवावी लागत आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.नळपाणी योजनेतील २१ गावे, ३१ वाड्यातील नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने, टंचाई आराखड्यात त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. दापोली तालुक्यातील देवाचा डोंगर जामगे, नवानगर, भाटी, उन्हवरे, फरारे-मोगरेवाडी, ओणी, माघारी, उटंबर, आतगाव, कवडोली या गावांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. फरारे-मोगरे, भोईवाडी, ओणी-भाटी ही गाव समुद्र खाडीकिनारी असूनसुद्धा, या गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे.टंचाई आराखडा दरवर्षी तयार केला जातो. मात्र, कायमस्वरूपी तोडगा सापडलेला नाही. काही गावांना टँकरवर अवलंबून राहवे लागते. दिवसाला चार हंडे पाण्यावर जीवन जगायचे कसे, असा प्रश्न आहे. देवाचा डोंगर, जामगेवाडीला पाणीटंचाईच्या काळात १० ते १४ किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फरारे-मोगरे या गावाच्या पायथ्याशी समुद्र आहे. पाणीटंचाईने त्यांच्या घशाला कोरड पडली आहे. अनेक गावांना विंधन विहिरीवर अवलंबून राहवे लागत आहे. दापोली तालुका निसर्गसंपन्न तालुका आहे. थंड हवेचे ठिकाण, कोकणचे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून दापोलीची ओळख असली, तरी कोकणच्या ‘मिनी महाबळेश्वर’ची पाण्याची तहान प्रशासनाला भागवता आलेली नाही.आजही पाण्यासारख्या मूलभूत गरजेकडे सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, पाणीटंचाई आराखडा तयार असला तरी त्याची अंमलबजावणी शून्य आहे. शासनाच्या पाणीविषयक धोरणाची अंमलबजावणी अधिक पारदर्शकपणे व्हायला हवी, ही अपेक्षा गेली अनेकवर्षे तशीच राहिली आहे.