शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

इमारतीचा लाखोंचा निधी मातीमोल

By admin | Updated: January 29, 2016 01:15 IST

दापोली नगरपंचायतीची कारवाई : मच्छिमार्केटची बिनवापराची इमारत १७ वर्षानंतर पाडली

दापोली : दापोली नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी दापोली ग्रामपंचायतीने सन १९९८-९९ दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुलभूत सुविधा एकात्मिक विकास अंतर्गत मच्छीमार्केट परिसरात इमारत बांधली. या मच्छिमार्केट इमारतीचा वापर न झाल्याने इमारत उभारणीसाठी १७ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झालेला ६ लाख ३० हजार रूपयांचा निधी मातीमोल झाल्याचे पुढे आले आहे. ही इमारत नगर पंचायतीने वापराविनाच पाडून टाकल्याने या इमारतीवर खर्च झालेला करदात्यांचा निधी पाण्यात गेला आहे.दापोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनेश नायक असताना या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. दापोली-खोंडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या मासळी विक्रेत्या महिलांसाठी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्याअगोदर रस्त्यालगतच मासळी विक्री करण्यात येत होती. या मासळी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आणि रस्त्यापासून थोड बाजूला सुसज्ज इमारत असावी, या उद्देशाने दापोली ग्रामपंचायतीने ६ लाख ३० हजार रूपये खर्च करून ही इमारत बांधली. या इमारतीमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी ओटे, उंचवटा, सांडपाण्यासाठी नियोजित मार्ग, मासळी ग्राहकांना कापून दिल्यानंतर उरणारे काटे आणि अन्य मासळीचे टाकावू तुकडे टाकण्यासाठी खास हौददेखील बांधण्यात आला होता. याच ठिकाणी शहरातील ७ ते ८ कोंबडी विक्रेत्यांसाठी १२ गाळे देखील बांधण्यात आले होते. जेणेकरून सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या मच्छिमार्केट परिसरातील वाहतूक कोंडी टळावी आणि रस्त्यावरून ये-जा करताना दुर्गंधीही येऊ नये. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कोंबडी विक्रेते या इमारतीमध्ये जाण्यास तयार होते. मात्र, वर्षानुवर्ष एकाच जागेवर मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी या इमारतीचा वापर करण्यास नकार दिला. तत्कालिन काही राजकीय पुढाऱ्यांनी दापोली शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या मुद्द्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली. एवढेच करून ते थांबले नाहीत तर शहराबाहेरून दापोली शहरात मासळी विक्रीला येणाऱ्या मासळी विक्रेत्यांनी काढलेल्या मोर्चाला पाठिंबाही दर्शवला. दापोली ग्रामपंचायतीने नव्याने बांधलेली इमारत रस्त्यापासून थोडी बाजूला असल्याने आपल्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल आणि पूर्वापार असलेली जागा आम्ही सोडणार नाही असा पवित्रा मासळी विक्रेत्या महिलांनी घेतला. यामुळे सन १९९९ ते सन २०१६ अशी एकूण १७ वर्ष ही इमारत बिनवापराची पडीकच राहिली होती. दरम्यान ग्रामपंचायतीच्या कालखंडात मटण मार्केटसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीचा वापर मात्र मटण विक्रेत्यांनी केल्याने हा खर्च वाया गेला नाही. दापोली नगरपंचायतीला अद्ययावत मच्छिमार्केटसाठी सुमारे २ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नगरपंचायतीकडून अद्ययावत मच्छि आणि मटण मार्केटच्या इमारतीची उभारणी केली जाणार आहे. याकरिता दापोली ग्रामपंचायतीने बांधलेली आणि वापर न होता पडीक राहिलेली मच्छिमार्केटची इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. याच जागेवर नव्याने अद्ययावत मच्छिमार्केट उभे राहणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मासळी विक्रेत्या महिलांनी नवीन इमारतीत व्यवसाय सुरू न करता जुन्याच जागेवर मासळी विक्री केली तर प्रशासनाकडून कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, दापोली नगरपंचायतीकडून सध्या इमारतीच्या बांधकामाची कार्यवाही हाती घेण्यात आली असून, शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा सुयोग्य वापर करून नवीन इमारत दिमाखात उभी राहणार आहे. (प्रतिनिधी)...अन्यथा ग्रामपंचायतीचा खर्च वाया गेला नसतामासळी विक्रेत्या महिला पूर्वापार जरी मच्छिमार्केट येथील पत्र्याच्या शेडमध्ये मासळी विक्री करत असल्या तरी दापोलीत शहराबाहेरून येणाऱ्या मासळी व्यवसायिक वा अन्य विक्रेत्यांनी कुठे व्यवसाय करावा हे ठरवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या निर्णयाला डावलणे योग्य ठरणार नाही. दापोली ग्रामपंचायतीने मासळी विक्रेत्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मच्छिमार्केटची स्वतंत्र इमारत बांधून सुवर्णमध्य साधला होता. या इमारतीत मासळीचे खराब पाणी जाण्यासाठी आणि मासळीचे काटे देखील इतरत्र न पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. काही पुढाऱ्यांनी दापोली ग्रामपंचायतीच्या निर्णयाला विरोध केल्याने ही इमारत बिनवापराची पडून राहिली. ग्रामपंचायतीच्या कार्यकालात जर शहरातील नागरिकांनीच उठाव केला असता तर ग्रामपंचायतीची ही इमारत बिनवापराची पाडावी लागली नसती, अशी प्रतिक्रिया आता सुजाण दापोलीकर व्यक्त करत आहेत.