शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेसाठी व्यवस्थापन समित्या

By admin | Updated: August 17, 2014 00:22 IST

प्रकल्पाचे काम सुरू : २0१६ पर्यंतची मुदत

संदीप बोडवे ल्ल मालवणसिंधुदुर्गातील जैवविविधतेच्या रक्षण व संवर्धनाकरिता आता गावागावांमध्ये ‘जैवविविधता व्यवस्थापन समित्या’ स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेता या समित्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. वनविभाग व युएनडीपीच्या माध्यमातून मालवण, देवगड, वेंगुर्ला येथे जैवविविधता प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची मुदत २०१६ पर्यंत आहे. या नंतरही या प्रकल्पाचे कार्य जिल्ह्यात सुरळीत चालू राहण्याकरिता या समित्यांचा उपयोग होणार आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता नियम २००८ नुसार जैवविविधता कायदा २००२ च्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या निर्देशानुसार जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील समितीकरिता ग्रामसभेद्वारे ७ नामनिर्देशित सदस्य व सचिव म्हणून ग्रामसेवकांची नियुक्ती करावयाची आहे. याशिवाय आमंत्रित सदस्य म्हणून जैवविविधता संदर्भातील विविध विषयातील तज्ज्ञ व सरकारी विभागांमधून वन, कृषी, पशुपालन, आरोग्य, मत्स्यपालन, शिक्षण व आदिवासी विभाग यांचे प्रतिनिधी नियुक्त करता येऊ शकतात. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ याच्या कलम ४९ नुसार ग्रामसभेची उपसमिती म्हणून या समितीची स्थापना होईल.समितीद्वारे जैवविविधता कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. या समित्यांना जैवसंसाधनाच्या वापराबाबत परवानगीचा निर्णय घेण्याचा तसेच जैविक स्त्रोताच्या वापरासाठी शुल्क वसुलीचा अधिकार राहणार आहे.राष्ट्रीय जैविक विविधता प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळाने वेळोवेळी दर्शविलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे जैविक विविधता निधीचे व्यवस्थापन व वापर करणे समितीला बंधनकारक आहे. जैविक संसाधन असलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे आणि पारंपरिक ज्ञान प्राप्त करणे व लाभाच्या वाटपाची नोंद ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जैविक विविधता प्राधिकरण चेन्नई आणि महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळाला गरज भासेल तेव्हा विविध विषयावरील माहिती व मते सादर करण्याची समितीची जबाबदारी राहणार आहे.