शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांनी स्वत:ला स्वत:चेच प्रेरणास्थान बनवा

By admin | Updated: March 9, 2015 23:53 IST

रश्मी आठल्ये: राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे महिला मेळावा

रत्नागिरी : स्त्रियांनी सक्षम, सुशिक्षित व सबळ होण्यासाठी प्रत्येक घरातील पुरुषही सक्षम, सबळ, सुशिक्षित होणे आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वत:ला घडवित असताना स्वत:चेच प्रेरणास्थान बनावे, असे आवाहन डॉ. रश्मी आठल्ये यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे आयोजित महिला मेळाव्यात डॉ. आठल्ये बोलत होत्या. रत्नागिरी येथे महिला दिनानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना त्यांनी पंडुरोगाविषयी माहिती देऊन स्त्रियांमधील घटणाऱ्या हिमोग्लोबीनच्या प्रमाणाबद्दल माहिती दिली. स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये ०.९ टक्के असलेले एचआयव्हीचे प्रमाण घटत असल्याचे सांगून सध्या ते ०.१ टक्क्यावर आले असल्याचे नमूद केले. समाजाला एचआयव्हीपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी असून, ती जोपासणे आवश्यक असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.मेधा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना स्त्री सक्षम बनली, तरच कुटुंबाची प्रगती होते, प्रत्येक स्त्रीने स्त्रियांचा आदर राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिला महिलांप्रती आदर राखेल, त्याचवेळी अन्यजनही आदर करावयास शिकतील, असे त्या म्हणाल्या.विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले. यावेळी रत्नागिरी विभागातील विविध कर्मचारी महिला भगिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)महिला दिनानिमित्त केले होते आयोजन.महिलांना पंडुरोगाविषयी दिली माहिती.स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक : आठल्ये.स्त्रियांनी स्त्रियांचा आदर करावा : कुलकर्णी.