शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एम. एच. मरिगौंडा --कृषिक्रांतीचे शिलेदार

By admin | Updated: September 20, 2015 23:42 IST

शास्त्रशुध्द फळबागांची निर्मिती

वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्न पदार्थामध्ये वनस्पतींचे सर्व घटक अन्न म्हणून स्विकारले गेले आहेत. गाजर, बीट, कंदमुळे ही मुळे जशी आहारात वापरली जातात. तशीच पाने ही देखील अन्न म्हणून वापरली जातात. तृणधान्य ही तर प्रमुख अन्नघटक बनली आहेत. विविध जीवनसत्वे, क्षार यासाठी फळांचा वापर मानवी संस्कृतीचा जेव्हापासूनचा इतिहास माहिती आहे तेव्हापासून दिसून येतो. ‘शबरीची बोरे’ हे रामायणातील महत्वाचे प्रकरण आहे. फळांचे महत्व शालेय शिक्षणापासून आपणास शिकवले जाते. या फळांचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने फळबागांची निर्मिती करण्याचे यशस्वी प्रयत्न करणारे आणि भारतात फलोद्यान शास्त्र विकसित करणारे असे फलोद्यान शास्त्राचे जनक म्हणजे डॉ. एम. एच. मरिगांैडा. डॉ. मरिगौंडा यांचा जन्म ८ आॅगस्ट, १९१६ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वनस्पतीशास्त्राची एम. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर सन १९४२मध्ये त्यांची सहाय्यक उद्यान अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. शासकीय उद्यानाचे अधीक्षक रावबहाद्दूर एच. सी. जावराया यांच्या देखरेखीखाली ते लालबाग उद्यानाचे काम पाहू लागले. त्यांच्या कामातील प्रगती पाहून सन १९४७मध्ये फलोद्यानाचे सखोल प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना रॉयल बोटॅनिकल गार्डन, इंग्लंड येथे पाठवण्यात आले. सहा महिने तेथील उद्यानांचा अभ्यास करून ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी प्रसिध्द हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर लगेच सन १९५१मध्ये ते भारतात परत आले. परत येताच त्यांना पदोन्नत करून उद्यान उपअधीक्षकाचे पद देण्यात आले आणि थोड्याच दिवसात ते लालबाग उद्यानाचे अधीक्षक बनले. सन १९६३मध्ये त्यांना फलोद्यान विभागाचे म्हैसूर राज्याचे संचालक बनवण्यात आले. त्याकाळी फलोद्यान विभाग हा अत्यंत दुर्लक्षित होता. म्हैसूर राज्यात फलोद्यान क्षेत्राचा त्यांनी मोठया प्रमाणात प्रसार केला. एवढंच नव्हे तर त्यांनी लोकांना फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहितही केले. त्यापूर्वी कृषी विभागांतर्गत फलोद्यान विभाग होता. मात्र, मारिगौंडा यांनी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून फलोद्यान विभागाची स्वतंत्र निर्मिती केली. त्यांनी फलोद्यानासाठी चतु:सूत्री तयार केली. पूर्ण राज्यात ३८० ठिकाणी फळबागा आणि रोपवाटिका तयार केल्या. या रोपवाटिका केवळ रोपवाटिका नव्हत्या तर नवीन वाणांची निर्मिती करणारी केंद्रे होती. फळांच्या लागवडीची आणि संगोपनाची नवी तंत्रे निर्माण करणारी केंद्रे बनली. विषेशत: नारळाच्या नव्या वाणांची निर्मिती मोठया प्रमाणात करण्यात आली. बेल्लार आणि कन्नमंगल या केंद्रांनी केलेल्या कार्यामुळे डॉ. मारिगौंडा यांचे नाव भारतभर झाले. फळबागांच्या प्रयोगासाठी मारिगांैडा यांनी रोपवाटिकांबरोबर प्लँट प्रोटेक्शन, लॅबोरेटरी, मृद संधारण प्रयोगशाळा आणि बीज चाचणी प्रयोगशाळांची लालबाग उद्यानात स्थापना केली. फळांचे मोठया प्रमाणावर उत्पादन झाल्यावर त्यांचे जतन करणे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे असते. फळातून अनावश्यक पाणी काढून टाकण्याचे तंत्र आणि यंत्र विकसित केले. त्यांनी विविध वाण स्वत: तयार केले आणि जनतेपर्यंत पोहोचवले. जिरायती शेतीत फळबागा लावण्यासाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहित केले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर उत्तम उत्पादन देणाऱ्या अनेक फळबागा निर्माण करून समाजासमोर आदर्श उभा केला. आपोआपच शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले आणि हळूहळू शेतकऱ्यांचा फळबागांकडे ओढा वाढू लागला.कोणत्या फळबागेत कोणते आंतरपीक घ्यावे हे स्वत: प्रयोग करून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या या अजोड कामगिरीमुळे कर्नाटक फळांचे राज्य बनले. भरपूर उत्पादन देणारे ‘मलिका’ आंबा बाण त्यांच्याच काळात प्रसिध्द झाले. सन १९७६ला ते सेवानिवृत्त झाले आणि सन १९९२ला निधन होईपर्यंत बेंगलोर येथे वास्तव्य केले, मात्र, अखेरच्या श्वासापर्यंत ग्रामविकास आणि फलोद्यान क्षेत्रात ते कार्यरत राहिले.- डॉ. व्ही. एन. शिंदेउपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर