शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या कॉल्सनी ग्राहकांची लूट

By admin | Updated: February 13, 2015 22:54 IST

ग्राहक अनभिज्ञ : आमिषांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतेय

चिपळूण : सध्या मोबाईद्वारे विविध आमिषे दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत अनेक वृत्त प्रसिद्ध होत असताना मात्र ग्राहकांमध्ये फारशी जागृती नाही. अनेकजण आजही या फसव्या आमिषांना बळी पडत आहेत.झटपट श्रीमंत होण्यासाठी किंवा आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येकजण पैशाच्या मागे आहे. त्यातच मोबाईलवर वेगवेगळे एस. एम. एस. किंवा कॉल्स येतात. त्या मधाळ बोलण्याला किंवा एस. एम. एस.ला ग्राहक भुलतात आणि पैसे भरतात. काही मिनिटांतच आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. ‘मग दातही आपलेच, ओठही आपलेच’ असल्याने इज्जत जाईल म्हणून गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांत तक्रार दिली, तर आपलेच पितळ उघडे पडणार म्हणून तिकडे कोणी फिरकत नाही.मोबाईलवर केवळ ए. टी. एम.चाच क्रमांक नाही. तर कधी कधी टि.व्ही.बाबत, कधी मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा एल. आय. सी.च्या बोनस बाबत चर्चा केली जाते. मोबाईलवरून धनादेश पाठवण्यासाठी पत्ता व अन्य तपशीलही विचारला जातो. अनेकांच्या पॉलिसी असल्याने त्याबाबत विश्वास ठेवला जातो. काहींचा क्लेम अडकलेला असल्याने ते या मोहजालात अडकतात. अनेकांना आजपर्यंत असे अनेक फोन आले आहेत. अनेकांची फसवणूक झाली, पण यात एलआयसीचा किंवा एजंटचा काही संबंध नसतो. लोक यात पुरते फसतात. अशा फसवणूकींपासून नागरिकांनी सावध राहायला हवे. आता आॅनलाईन फसवणुकीचे प्रकारही कमालीचे वाढले आहेत. या सर्व प्रकारात संबंधितांकडून अधिक चौकशी व्हायला हवी, असे सर्वांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)