शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ ने जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले

By admin | Updated: November 6, 2015 00:01 IST

संतोष भिसे यांचे गौरवोद्गार : कणकवलीत ‘लोकमत दीपोत्सव २0१५’ चे प्रकाशन

कणकवली : गतवर्षी १ लाख प्रतिंचा विक्रमी ठप्पा गाठणाऱ्या आणि दिवाळी अंकामधील मानबिंंदू समजल्या जाणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव २0१५’ च्या अंकाचे प्रकाशन कणकवलीचे प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्याहस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. ‘लोकमत’ ने वाचकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. ते टिकविण्यासाठी राबवित असलेले विविध उपक्रम समाजाला नेहमीच उपकृत करतात, असे उद्गार यावेळी भिसे यांनी बोलताना व्यक्त केले.‘लोकमत’च्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात झालेल्या या प्रकाशन समारंभाला कणकवलीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार आणि वितरक अशोक करंबेळकर आणि ‘लोकमत’ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. प्रांताधिकारी भिसे म्हणाले, ‘लोकमत’ हे परिपूर्ण दैनिक असून आपण सातत्याने विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. सन २0१३ साच्या दीपोत्सव आजही माझ्याकडे आहे. तो मी जपून ठेवला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जिवनात वाचनासाठी लोकांना फार कमी वेळ मिळतो. मात्र, असे असले तरी दिवाळी अंक वाचणाऱ्या वाचकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. दीपोत्सव तयार करण्यासाठी ‘लोकमत’ची सर्व टीम घेत असलेली मेहनत या अंकाच्या पानापानातून दिसत आहे. सूत्रसंचालन आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांनी केले.(प्रतिनिधी)लोकमत हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘लोकमत’ने अल्पावधीत वाचकांशी वेगळे नाते जोडले आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’ ने सुरूवातीपासून पुढाकार घेतला. विविध योजनांमधून आणि स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावली. - माधुरी गायकवाड, नगराध्यक्षा, कणकवलीदिवाळी अंक कसा असावा याचे उदाहरण म्हणून दीपोत्सवाकडे पहावे लागेल. गतवर्षी महाराष्ट्रात १ लाख प्रति विक्री करून वेगळा आदर्श निर्माण केला. समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधीत्व करून ते विधायक दृष्टीकोनातून मांडण्याचा टीमचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. - अशोक करंबेळकर, ज्येष्ठ पत्रकार, कणकवली