शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मातोंडमध्ये बिबट्याचा थरार

By admin | Updated: May 27, 2014 01:19 IST

आठ तास झाडावरच : तळवडेतील युवक गंभीर जखमी

तळवडे (सिंधुदुर्ग) : मातोंड मिरिस्तेवाडी येथे बिबट्याच्या जीवघेण्या थराराने एकच खळबळ उडाली. येथील सावळ यांच्या बागेतील ऐन वृक्षाच्या शेंंड्यावर बसलेल्या बिबट्याला वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल आठ तासांच्या थरारक प्रयत्नाने खाली उतरविण्यात यश आले. मात्र, या प्रयत्नात तळवडे येथील युवक अविनाश आंगचेकर हा गंभीर जखमी झाला. बिबट्याला खाली उतरविण्यासाठी झाडावर चढून फांदी तोडत असताना बिबट्याने अचानकपणे या युवकावर उडी घेतली. या झटापटीत दोघेही सुमारे ८० फुटांवरून खाली कोसळले. दरम्यान, बिबट्याने सुखरूपपणे जंगलात धूम ठोकली. या युवकाला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत ााहिती अशी की, मातोंड मिरिस्तेवाडी परिसरात गेले दहा महिने बिबट्याची दहशत आहे. अनेक कुत्री तसेच गाई, म्हशी या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी यापूर्वी पडल्या आहेत. हाच बिबट्या आज, सोमवारी पहाटे भरवस्तीतील सावळ यांच्या बागेतील ऐनाच्या झाडावर चढून बसलेला ग्रामस्थ गजानन रेडकर यांना दिसला. त्यावेळी हा बिबट्या अगदी वीस ते पंचवीस फुटांवर होता. रेडकर यांनी परिसरातील ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ सावळ यांच्या बागेकडे जमू लागले. त्यामुळे बिबट्या चांगलाच बिथरला आणि झाडावर जाऊ लागला. दहा वाजण्याच्या सुमारास तो ऐनाच्या झाडाच्या शेंड्यावर म्हणजे तब्बल ८० फुटांवर जाऊन बसला. बर्‍याच उशिराने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले; पण जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. यावेळी ग्रामस्थ बिबट्यावर दगड तसेच अ‍ॅटमबॉम्बचा मारा करीत होते, तर काही ग्रामस्थ मोठमोठ्याने ओरडत असल्यामुळे बिबट्या शेंड्यावरून हलत नव्हता. अखेर साडेबारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी तब्बल साडेपाच तासांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्यात आला. ग्रामस्थांनी वनअधिकार्‍यांचा चांगलाच हुर्यो उडविला. मात्र, एक वाजण्याच्या सुमारास प्रभारी उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांनी सूत्रे हाती घेत बिबट्या ज्या झाडावर होता, त्या झाडाला लांब दोरी बांधण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने ते झाड हलविण्यात आले; पण बिबट्या झाडाच्या फांद्यांत जाऊन बसला होता. त्यामुळे तो हलवून खाली येत नव्हता. अखेर तळवडे येथील युवक अविनाश आंगचेकर याने झाडावर चढून ज्या फांदीवर बिबट्या बसला होता, तीच फांदी तोडण्याचा निर्णय घेतला. अविनाश फांदीवर चढून दोन घाव घालतो न घालतो तोच बिबट्याने त्याच्यावरच झेप घेतली. ही झेप एवढी जबरदस्त होती की, बिबट्यासह अविनाशही खाली कोसळला. तब्बल ८० फुटांवरून तो खाली कोसळला. खाली पडताच बिबट्या जंगलात पळून गेला. या घटनेत अविनाश गंभीर जखमी झाला आहे. त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्बल आठ तास चाललेला हा थरार अखेर पावणेदोनच्या सुमारास संपला. यावेळी या परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)