शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी बल्बचे होणार साम्राज्य

By admin | Updated: November 5, 2015 00:19 IST

विजेची बचत : राज्यात १ लाख ६२ हजार ग्राहकांना लाभ

राजापूर : वीज बचतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्बचे वाटप करण्यात आल्याने भविष्यात राज्यात एलईडी बल्बचेच साम्राज्य निर्माण होणार आहे.एकीकडे विजेचा अमर्यादीत वापर तर दुसरीकडे वीज निर्मितीची मर्यादीत साधने यामुळे महाराष्ट्र राज्यासहित देशाला वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सर्वत्र सीएफएल किंंवा आयसीएल बल्बच्या वापरामुळे ज्या प्रमाणात वीज खर्च होत होती त्यापेक्षा खूपच कमी वीज ही एईडीमुळे खर्च होत आहे. जवळपास ८० टक्के वीजबचत या बल्बच्या वापरामुळे होते. राज्यात वीज पुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचे राज्यात १ कोटी ६२ लाख ६१ हजार ४२० ग्राहक आहेत. त्यांना १६ हजार ६५७ दशलक्ष युनिट वीज लागते व एकूण वापराच्या १९.४५ टक्के वीज वापर या ग्राहकांकडून होतो. आजवर बहुतांशी ग्राहकांनी सीएफएल किंंवा आसीएल बल्बचाच वापर केला आहे व अजून देखील तो चालूच आहे. त्यामुळे विजेचा जास्त वापर होतो. एलईडी बल्बमुळे एकूण ८० टक्के विजेची बचत होते. त्यामुळे प्रतिनग ४०० रुपयांना विक्री होत असलेले एलईडी बल्ब ग्राहकांना सवलतीच्या दरात १०० रुपये प्रती नग उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना हे बल्ब प्राप्त होतील. या बल्बचे २५ हजार तास जीवनमान असून, हा बल्ब ७ वॅटचा असणार आहे. त्याला ३ वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी असेल. प्रत्येक वीज ग्राहकाला चालू वीज देयके दाखवून हे बल्ब खरेदी करता येतील तसेच प्रती बल्ब १० रुपये भरुन उर्वरीत रक्कम वीज देयकात १० हप्त्यात भरण्याची सुविधा देखील महावितरणने दिली आहे. त्यामुळे या बल्बकडे ग्राहकांचा प्रचंड ओढा आहे. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात या बल्बची खरेदी ग्राहकांनी केली आहे. भविष्यात संपूर्ण राज्य एलईडी बल्बने झगमगून जाणार आहे. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. (प्रतिनिधी)आगामी संकट : आत्तापासूनच उपाययोजनाआगामी काळात येणारे विजेचे संकट ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे या संकटाला रोखण्यासाठी आत्तापासूनच शासनाने प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे शासनाकडून एलईडी बल्बचे वितरण सुरु करण्यात आले आहे.माफक किंमतएलईडी बल्बची किंमत माफक आहे. तसेच त्यापासून वीजबचतही होणार आहे. पर्यायाने वीजबिलातही कित्येक पटीने अधिक बचत होणार आहे.