शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाचा ग्रंथदिंडीने प्रारंभ

By admin | Updated: October 24, 2015 23:21 IST

कुडाळ संत राऊळ महाराज विद्यालय : ढोल ताशांच्या गजरात, मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी परिसर दुमदुमला

 कुडाळ : मोठ्या उत्साहात, ढोल ताशांच्या गजरात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाची शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरात ग्रंथदिंडीने सुरूवात झाली असून रविवारी सकाळी या संमेलनाचे उद्घाटन कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग साहित्य संमेलनाला शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातून निघालेल्या ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या टोपीवाला वाचनालयाकडून ग्रंथदिंंडीला सुरूवात होऊन आरती प्रभू साहित्य नगरीत सांगता झाली. या ग्रंथदिंडीत चित्ररथ, मुलांच्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर संमेलनस्थळी कै. तन्मय मधुभाई कर्णिक रंगावली प्रदर्शन तसच अ‍ॅड. डी. डी. देसाई ग्रंथदालनाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष विष्णू सूर्या वाघ, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आदी मान्यवर उपस्थित होते. उद्या सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार असून कवी आणि नाटककार विष्णू सूर्या वाघ हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. पुस्तक प्रदर्शन, मान्यवरांचे सत्कार तसेच कवी संमेलन असे कार्यक्रम होऊन सायंकाळी संमेलनाची सांगता होणार आहे. या ग्रंथदिंडीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कवी रूजारिओ पिन्टो, चंदु शिरसाट, मंगेश मसगे, आनंद मर्गज, वृंदा कांबळी, केदार सामंत, उमेश गाळवणकर, राजन पांचाळ, मिलिंद देसाई, अजित फाटक, समीर तारी व इतर साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी) आज संमेलनाचे उद्घाटन : दीडशे वर्षाची परंपरा ४उद्या (दि. २५ रोजी ) सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार असून कवी आणि नाटककार विष्णू सूर्या वाघ हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. ४दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या टोपीवाला वाचनालयाकडून ग्रंथदिंडीला सुरूवात होऊन आरती प्रभू साहित्यनगरीत सांगता झाली.