शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नावावर जमीन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 00:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : माणगाव आकारीपड प्रकरण

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ९७४ वहीवाटदार आकारीपड शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करुन येथील जमीन वहिवाटदार शेतकऱ्यांच्या नावे करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती या संदर्भातील याचिकेतर्फे बाळ सावंत यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना बाळ सावंत म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील आकारीपड प्रश्न रेंगाळत पडला होता. या प्रश्नातून येथील वहिवाटदारांची सुटका व्हावी या उद्देशाने आकारीपड विरोधात येथील वहिवाटदार शेतकऱ्यांनी २५ जुलै २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल येथील शेतकऱ्यांच्या बाजूने लागला होता. याच न्यायालयाच्या निर्णयानुसार उर्वरीत ९७४ शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वहिवाटदार वामन धुरी (निवजे), सुभाष तुळसकर (रांगणा तुळसुली), चंद्रकांत तानावडे (नारुर) व इतरांनी पुन्हा याचिका दाखल केली होती.या याचिकेचाही निकाल उच्च न्यायालयाने पूर्वीच्याच आदेशाप्रमाणे देऊन येथील प्रशासनाने योग्य ती कारवाई करुन येथील वहिवाटदारांच्या नावे जमिनी करुन देण्यात याव्यात असा निर्णय दिला असून या संदर्भातील याचिका २० एप्रिलपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिकाकर्ते यांनी द्यायची आहे, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या याचिकेत १६४ वहिवाटदारांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला होता. तरीपण महसूल यंत्रणेने ४१ वहिवाटदारांनाच जमिनी देण्याचे निश्चित केले. मात्र त्याकरिता जमिनीची मोठी किंमत बाजार भावाने करण्यात आली. त्यालाही आमचा कायमचाच विरोध राहील, असेही बाळ सावंत म्हणाले. या संदर्भातील शासनचा १९८७ जी. आर. मध्ये जमिनी देताना कोणत्याही प्रकारची किंमत आकारण्याचे नमूद केले नाही. बाजारमूल्यही घेऊ नये. तरीही मोठी किंमत आकारली जाते, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. आकारीपड वहिवाटदार जमीन ११ आॅगस्ट २००० मध्ये वाटप करण्याच्या निर्णयाला स्थगिती आणल्यानंतरही ५0८ शेतकऱ्यांना जमिनी देत प्रशासनाने सातबारांवर त्यांची नावे कशी चढविली, असा प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला आहे. त्यामुळे मागण्या मान्य करुन घेण्यासाठी २0 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. १९४0 चे पुरावे शासन शेतकऱ्यांकडे मागत आहे. मात्र, शासनाकडे कोणते पुरावे आहेत त्याची तपासणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बाळ सावंत, डॉ. शरद पाटील, वामन धुरी, मुकूंद सरनोबत, सुभाष तुळसुलकर, राजू शेडगे, नागेश आईर, चंद्रकांत तानावडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)