शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलात पाणी सुविधेचा अभाव

By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST

चिपळूण पालिका : प्रशासनाच्या सुस्त कारभाराने संताप

चिपळूण : शहरातील अण्णासाहेब क्रीडा संकुलाची इमारत उभी राहून अंदाजे दीड वर्ष झाले, तरी या क्रीडा संकुलात पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. या क्रीडा संकुलामध्ये पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे. चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे पूर्वीच्या गाढव मैदानावर लाखो रुपये खर्च करुन अण्णासाहेब क्रीडा संकुल उभारण्यात आले. विविध क्रीडाप्रेमींना हे क्रीडा संकुल खेळांसाठी उपलब्ध व्हावे, हा यामागचा हेतू असला तरी वीज जोडणी नसल्याने हे क्रीडा संकुल असून नसल्यासारखेच आहे. आता वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले असून, गेल्या महिन्यामध्ये लोकसभेच्या अध्यक्षा आणि चिपळूणच्या सुकन्या सुमित्रा महाजन यांचा चिपळूण नगर परिषद प्रशासन आणि लोकमान्य टिळक वाचनालयातर्फे सत्काराचा कार्यक्रमही घेण्यात आला. शहरात एकमेव असे हे क्रीडा संकुल असल्याने या मैदानामध्ये ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची संयोजकांतर्फे तयारी सुरु आहे.या स्पर्धेपूर्वी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होण्याची शक्यता गृहीत धरून त्यापूर्वी नगर प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अण्णासाहेब खेडेकर क्रिडासंकुलाच्या उद्घाटनानंतर गेल्या वर्षभरात महत्वाच्या सुविधांकडे नगर पालिकेने लक्ष न दिल्यामुळे गैरसोय निर्माण झाली आहे. राज्य पातळीवरील स्पर्धेत येणाऱ्या खेळाडूंसाठी ही सुविधा असणे महत्वाचे मानले जात आहे. राज्याच्या विविध भागातून खेळाडू येथे येणार असून, या क्रीडा संकुलात अद्याप पाणी सुविधा उपलब्ध नसल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक इनायत मुकादम यांनी लक्ष वेधले आहे. या क्रीडा संकुलात पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाने त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. (वार्ताहर)