शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन काढून देणाऱ्या भामट्याचे अपहरण

By admin | Updated: August 20, 2015 23:09 IST

भामटा रत्नागिरी जिल्ह्यातील : दोघांना इस्लामपुरात अटक

इस्लामपूर : सावर्डे-चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भोंदू भामट्याचे अपहरण केल्याप्रकरणी मानपाडा (मुंबई) पोलिसांनी इस्लामपूरजवळच्या नरसिंहपूर आणि साखराळे येथून दोघांना ताब्यात घेतले. अपहरणाची ही घटना १५ आॅगस्ट रोजी मानपाडा पोलिसांच्या हद्दीत घडली होती. गुप्तधन काढून देण्यासाठी ३0 लाख रुपये घेतल्याच्या रागातून हे अपहरण झाले आहे.वैभव पाटणकर (रा. रत्नागिरी) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. त्याचे अपहरण करणाऱ्या टोळीतील युवराज कदम (नरसिंहपूर) व अमित चव्हाण (साखराळे) या दोघांना मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांनी कारवाई करून ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील आणखी सहाजण फरार झाले आहेत.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, वैभव पाटणकर आणि दीपक पाटणकर (दोघे रा. रत्नागिरी) या भोंदूंनी राजेंद्र साळुंखे (नरसिंहपूर) व अजित चव्हाण (रत्नागिरी) यांच्याकडून गुप्तधन काढून देण्यासाठी ३0 लाख रुपये घेतले होते; पण पाटणकर यांच्याकडून त्यासंबंधी काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच साळुंखे व चव्हाण यांनी पैसे परत मिळविण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे दोघेही पाटणकर परागंदा झाले होते.काही दिवसांनी वैभव पाटणकर हा मानपाडा हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यावर राजेंद्र साळुंखे, अजित चव्हाण, युवराज कदम, अमित चव्हाण यांच्यासह रत्नागिरी परिसरातील चौघे अनोळखी अशांनी मिळून वैभव पाटणकरचे १५ आॅगस्ट रोजी अपहरण केले. तेथून त्याला पनवेल, पुणे, उंब्रज मार्गे कुंभार्ली घाटातून पुढे एका निर्जनस्थळी असणाऱ्या बंगल्यावर नेऊन, कोंडून ठेवून मारहाण केली.दरम्यान, याबाबतचा गुन्हा दाखल होताच यातील संशयितांच्या मोबाईल लोकेशनवरून मानपाडा पोलिसांनी त्यांचा माग काढला. अपहरणानंतर युवराज कदम व अमित चव्हाण हे कऱ्हाडमधून आपापल्या गावी आले होते. बुधवारी रात्री मानपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलेश पाटील यांनी दोघांना ताब्यात घेतले.