शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत उद्या होणार नाट्यगान निपुण कला

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

अरविंद पिळगावकर : पन्नास वर्षांच्या अनुभवांचा आलेख उघडणार

कणकवली : ज्येष्ठ रंगभूमी कलाकार आणि गायक अरविंद पिळगावकर यांचा गेल्या ५० वर्षातील अनुभवावर आधारीत ‘नाट्यगान निपुण कला’ हा साभिनय नाट्यसंगीताचा कार्यक्रम जानवली येथील वृंदावन हॉलमध्ये होणार आहे. दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अरविंद पिळगावकर यांचा जन्म १८ आॅक्टोबर १९३७ रोजी झाला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी बी. ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. पद्मश्री दाजी भाटवडेकर यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. तर पं. के. डी. जावकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. गोविंद अग्निहोत्री हे त्यांचे गायनातील गुरू होते. १९६४ साली मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘यशवंतराव होळकर’ या ऐतिहासिक नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. १९६७ साली ‘संगीत वासवदत्ता’ या नाटकात त्यांनी नायक उदयनची भूमिका केली. या नाटकात सुहासिनी मूळगावकर या नायिकेच्या भूमिकेत होत्या. त्यानंतर ‘नयन तुझे जादूगार’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘जय जगदीश हर’, ‘पंढरपूर’, ‘धाडीला राम तिने का वनी’ इत्यादी नाटकांतून भूमिका केल्या. तसेच ‘सौभद्र’, ‘रामराज्य वियोग’, ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ आदी अभिजात संगीत नाटकात प्रमुख व चरित्र अभिनेत्याच्या विविध भूमिका पिळगावकर यांनी केल्या. ‘संगीत कान्होपात्रा’, ‘संत नामदेव’, ‘सोन्याची द्वारका’, ‘भाव तोचि देव’ इत्यादी नाटकांतून भक्तीरसपूर्ण भूमिका केल्या. ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘विठो-रखूमाय’, ‘दशावतारी राजा’ अशा लोककलांवर आधारीत नाटकांतून त्यांनी भूमिका साकारल्या.नानासो फाटक पुरस्कृत गणपतराव जोशी सुवर्णपदक, नाट्य परिषद पुरस्कृत बालगंधर्व पारितोषिक, केशवराव भोसले पुरस्कार, पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्कार, अशोक सराफ पुरस्कृत गोपीनाथ सावकार पुरस्कार (बोरिवली शाखा), प्रदीर्घ नाट्यसेवा गौरव (पुणे शाखा), तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणेचा पं. जितेंद्र अभिषेकी जीवनगौरव पुरस्कार, गणपती न्यास (फडकेवाडी) गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार (सांगली), दीनानाथ मंगेशकर रंग पुरस्कार (गोवा), महाराष्ट्र शासनाचा आण्णासो किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार यांनी पिळगावकर यांना गौरवण्यात आले आहे.या कार्यक्रमातून पिळगावकर हे त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनाचा प्रवास साभिनय उलगडणार आहेत. (प्रतिनिधी)साभिनय नाट्यसंगीताचा कार्यक्रम.कणकवलीतील जानवली येथे होणार कार्यक्रम.पिळगावकर विविध पुरस्कारांनी सन्मानित.विविध नाटकांमधून केली कामे.दाजी भाटवडेकर यांच्याकडे अभिनयाचे धडे.