शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कनेडी, फोंडा हायस्कूलचे वर्चस्व

By admin | Updated: September 11, 2015 22:07 IST

२७ संघांचा सहभाग : कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा

खारेपाटण : क्रीडा युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कणकवली तालुका कबड्डी स्पर्धा खारेपाटण येथे पार पडल्या. या स्पर्धेत कनेडी, फोंडा हायस्कूलने आपल्या यशाचा झेंडा फडकवीत जिल्हास्तरीय स्पर्धेत मजल मारली.खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस झालेल्या या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील २७ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १४ वर्षीय ग्रामीण (पायका) मुली ४ संघ, १४ वर्षीय ग्रामीण (पायका) ६ संघ, १७ वर्षीय मुली ७ संघ, १७ वर्षीय मुलगे १0 संघ, तर १९ वर्षांखालील मुलांचा-मुलींच्या संघाचा विभागणी करून कबड्डी सामना खेळविला.विशेष करून सर्व गटांच्या प्रकारात कनेडी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज तसेच फोंडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांनी आपला दबदबा निर्माण केला. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख ए. डी. राणे यांच्या हस्ते झाले होते. गटशिक्षणाधिकारी ए. के. कांबळे उपस्थित होते. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव परवेज पटेल, सुधाकर कर्ले, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक योगिनी रानडे, खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, राष्ट्रीय पंच मधुकर पाटील, तालुका क्रीडा समन्वयक बयाजी बुरान, आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी रघुवीर राणे, एस. एस. भोर, के. आर. पडवी, आदी शिक्षकांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)कबड्डी स्पर्धेचे विजेते संघ पुढीलप्रमाणे :१४ वर्षांखालील मुली करूळ हायस्कूल (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेता). १४ वर्षांखालील मुलगे एस. एम. हायस्कूल, कणकवली (विजेता), न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट (उपविजेता), १७ वर्षांखालील मुली कासार्डे हायस्कूल (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेता), १७ वर्षांखालील मुलगे फोंडा हायस्कूल (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेता), १९ वर्षांखालील मुले फोडाघाट कॉलेज (विजेता), खारेपाटण कॉलेज (उपविजेता). १९ वर्षांखालील मुली खारेपाटण कॉलेज (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेते).