शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काळसेकरांना गृहमंत्री भाजपचा असल्याचा विसर

By admin | Updated: November 13, 2015 23:41 IST

मच्छिमार संघर्ष : मनसेची टीका, पोलिसांची आचऱ्यात एकतर्फी कारवाई

कुडाळ : आचरा येथील पारंपरिक व पर्ससीननेट मच्छिमारांच्या संघर्षात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली, असा आरोप भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली. मात्र, काळसेकर यांना राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे असल्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. अतुल काळसेकर हे नक्की सत्ताधारी पक्षाचेच जिल्हाध्यक्ष आहेत ना, असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत पोलीस प्रशासन येते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत व ते भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मच्छिमारांच्या संदर्भात पोलीस एकतर्फी कारवाई करतात, असे विधान करणे म्हणजे गृहमंत्री फडणवीस यांच्या अपयशाला दुजोरा दिल्यासारखे आहे. पारंपरिक मच्छिमारांवर एकतर्फी कारवाई करत असताना राज्याचे पालकमंत्री झोपले होते का? दिवाळी तोंडावर असताना गोरगरीब पारंपरिक मच्छिमारांची धरपकड सुरू होती. तेव्हा काळसेकर कोणत्या बिळात दडून बसले होते? गृहमंत्र्यांचे आदेश आणून पारंपरिक मच्छिमारांवरील एकतर्फी कारवाई का थांबवली नाही? असे प्रश्नही मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहेत. तसेच आता पोलिसी कारवाईनंतर वर्तमानपत्रातून मगरीचे अश्रू ढाळून मच्छिमारांचे दु:ख आणि मन:स्ताप यत्किंचितही कमी होणार नाही, असा टोलाही परब यांनी काळसेकरांना हाणला आहे. (प्रतिनिधी)तेव्हा कुठे होते काळसेकर?आमदार वैभव नाईक यांना अटक करून दाखवाच, मग आम्ही काय ते दाखवून देऊ, अशी भीमगर्जना करणारे काळसेकर पारंपरिक मच्छिमारांवर कारवाई होताना गप्प का होते, असा सवाल परब यांनी विचारला आहे. गोरगरिबांपेक्षा सहकारी पक्षातील आमदारांची सुरक्षा महत्त्वाची वाटणारे काळसेकर यांनी मच्छिमारांवरील कारवाई रोखून दाखवली असती, तर ते नेमके काय चीज आहेत, हे जिल्हावासीयांना समजले असते.एकीकडे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर पारंपरिक व पर्ससीननेटधारक यांच्यात समन्वयासाठी बैठक आयोजित करीत असताना काळसेकर मात्र पारंपरिक मच्छिमारांचीच बाजू घेताना दिसत आहेत. यावरून जिल्ह्यातील भाजप नेत्यांची भूमिका संदिग्ध दिसत आहे. फक्त मासे खाण्यापलीकडे मच्छिमारी संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेले राज्याचे मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे हेही जबाबदार आहेत. त्यांच्याकडे भाजप नेते केवळ फोटोंसाठी निवेदने देतात. काळसेकर यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून द्यावी. काळसेकर हे गेली १५ वर्षे विरोधी पक्षात असल्याने विरोधक ते सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष ही गेल्या वर्षभरातील स्थित्यंतरे काळसेकर यांना मानवलेली नाहीत. त्यांचे आचरण अजूनही सत्ताधाऱ्यांसारखे नसून विरोधकांसारखेच असल्याचा टोला परब यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे.