शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहलीचे स्वप्न अधुरे ठेवूनच ती गेली...!

By admin | Updated: December 26, 2015 00:01 IST

‘तो’ दुदैंवी अपघात : हुशार मुलीच्या जाण्याने गाव हळहळला...

लांजा : तालुक्यातील कोचरी वावळ्याचा माळ येथे अ‍ॅक्टिव्हाच्या अपघातामध्ये जागीच ठार झालेली वर्षा सुधीर गुरव (११) ही पाचवीमध्ये शिक्षण घेत होती. वर्षा ही अतिशय हुशार तसेच क्रीडा स्पर्धेत नेहमीच उत्साहाने सहभागी व्हायची. चुणचुणीत असल्याने ती शाळेतील कार्यक्रमात नेहमीच पुढे असे. १ जानेवारी रोजी तिची माळवण येथे सहल जाणार होती. मात्र, तिचे सहलीचे स्वप्न अधुरेच राहिले. गुरुवारी ती साखरपा येथे वडिलांबरोबर खरेदीसाठी गेली होती. सकाळी १० वाजण्याच्या दम्यान परतीच्या प्रवासाला गाडी नसल्याने वर्षाच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या साखरपा येथील लादी कारागीर महेंद्रकुमार चौधरी (मूळ जयपूर) यांच्या अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकलवरुन ते पुर्ये मार्गे कोचरी येथे घरी येत असताना उतारावरील यु आकाराच्या अपघाती वळणावर गाडीवरील ताबा सुटला आणि मोटारसायकल उंच दरीच्या मुख्य रस्त्यापासून ८ फुटावर जावून अडकली. यामध्ये वर्षाचे वडील २५ फूट दरीत जावून कोसळले. तसेच वर्षा ही गाडीच्या शेजारीच दगडावर जाऊन आपटल्याने जागीच मयत झाली तर दुचाकी चालक चौधरी जखमी झाला.या अपघातातील मयत वर्षा हिने नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये खो - खो कॅप्टन म्हणून कामगिरी बजावली होती. आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची होती. १ जानेवारी रोजी शाळेची शैक्षणिक सहल असल्याने व गुरुवारी सुटी असल्याने ती आपल्या वडिलांबरोबर खरेदीसाठी गेली होती. मात्र, अपघातामध्ये ती मरण पावली. वर्षा हिचे सहलीचे स्वप्न मात्र यामुळे अधुरेच राहिले आहे. शिक्षण घेऊन आई-वडिलांचे हलाखीचे जीवन तिला सुधारायचे होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळाच विचार सुरु होता. नियतीने घाला घालून अल्पवयातच तिला हिरावून नेले. (प्रतिनिधी)वडिलांना अखेरचे दर्शनही नाही...!वर्षाचे वडील गंभीर जखमी असल्याने रत्नागिरी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने ते आपल्या लाडक्या मुलीचे अखेरचे दर्शनही घेऊ शकले नाहीत. ते अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. अतिशय दुखद अं:तकरणाने वर्षाचा अंतविधी करण्यात आला.