शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसात कागदपत्रांची पूर्तता करावी

By admin | Updated: December 11, 2014 23:43 IST

नवाबाग येथे मच्छिमारांची बैठक : वसंत तांडेल यांनी केले मार्गदर्शन

वेंगुर्ले : मासेमारीसाठी लागणारी बोटीची कागदपत्रे, मासेमारी नौकांसाठी रजिस्टेशनची कागदपत्रे ही बऱ्याचअंशी मच्छिमारांकडे पूर्ण नसून विशेषत: एक टनाखालील नौकांची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांना समुद्रात मासेमारी करताना शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाईच्या सदराखाली आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो, याकरिता येत्या १५ दिवसात कागदपत्रांची पूर्तता मुदत देण्यात यावी. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या मच्छिमारांच्या संघर्षाचा यशस्वी तोडगा काढण्यात येऊन समुद्रात मासेमारी करण्याबाबत मालवणच्या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.वेंगुर्ले नवाबाग जेटीच्या ठिकाणी निवती, मालवण, देवबागमधील पर्ससीननेट मासेमारीमुळे झालेल्या संघर्षावर यशस्वी तोडगा काढण्यासाठी रापण, गिलनेट, न्हैय, मिनी पर्ससीननेटधारक मच्छिमारांची बैठक पार पडली. यावेळी मच्छीमार नेते वसंत तांडेल, दादा कुबल, पुंडलिक केळुसकर, बाबी रेडकर, अशोक सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी निवती व वेंगुर्लेच्या कुठल्याही पर्ससीननेट मच्छिमारांनी मालवण परिसरात जात मासेमारी न करण्याचा निर्णय घेतला. तसेच कोणत्याही परिस्थितीत मासेमारीला बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. याचबरोबर मासेमारीसाठी मत्स्य विभागाने दिलेला परवानाच अंतिम परवाना असेल. त्यामुळे अन्य साधनाने मासेमारी करताना वेगळ्या परवान्याची अट असू नये, असा ठराव घेण्यात आला. यावेळी अशोक सारंग, कमलेश मेतर, सुरेश पडते, आबा कोचरेकर, सुरेश कोचरेकर, सुहास तोरसकर, बाळ तोरसकर, हेमंत येरागी, सूर्या सांगवेकर, बाबी रेडकर, मोहन सागवेकर, सतिश हुले, आनंद वेंगुर्लेकर, अनंत केळुसकर, अशोक खराडे, जनार्दन कुबल, सुबोध खडपकर, जनार्दन खडपकर, आशिष तोरस्कर, राजन तोरस्कर, भाग्यवान गिरप, राजन घाटवळ, विनोद नाईक, गोपाळ बटा, दिलीप नाईक, रमेश बटा, अण्णा सागवेकर आदी मच्छीमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)