शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भुसभुशीत माती असते तेथेच घुशी घुसतात

By admin | Updated: June 30, 2015 00:16 IST

राज ठाकरेंचा सावधानतेचा इशारा : दोडामार्गात मनसेचा कार्यकर्ता मेळावा

दोडामार्ग : मुंबईत उपऱ्यांच्या घुसखोरीमुळे जशी परिस्थिती निर्माण झाली, तीच परिस्थिती दोडामार्ग तालुक्याचीदेखील आहे. केरळीयनांची घुसखोरी याठिकाणी वाढली आहे. पण लक्षात ठेवा, जिथे भुसभुशीत माती असते, त्याचठिकाणी घुशी घुसतात. त्यामुळे जर महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर कातळासारखे, खडकासारखे घट्ट बना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीयाविरोधात नेहमी तुमच्या पाठीशी राहील, असे उद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोडामार्ग येथे काढले. दोडामार्ग येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष संतोष आईर, दीपक गवस, श्रेया देसाई उपस्थित होती. ठाकरे पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे. आतापर्यंत याठिकाणी हत्तींचा हैदोस असल्याचे ऐकले होते. मात्र, याठिकाणी आल्यावर केरळीयनांचे प्रताप वाढल्याचे कळले. आज जी परिस्थिती मुंबईत आहे, तीच याठिकाणी सुध्दा आहे. मुंबईत उपऱ्यांचे काय झाले, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे याठिकाणची भूमी जर वाचवायची असेल, तर परप्रांतीयांना धडा शिकवलाच पाहिजे. कुठून कुठच्या लुंगीत येतात आणि जमिनी बळकावतात. यांना गप्प राहता कामा नये. नाहीतर एक दिवस रडत बसण्याची वेळ येईल. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी भुसभुशीत जमीन असते, तेथेच घुशी घुसतात आणि ज्या ठिकाणी कातळ जमीन असते, त्याठिकाणी घुसखोरी होत नाही. त्यामुळे आपली भूमी आणि महाराष्ट्राला वाचवायचे असेल, तर कातळाप्रमाणे खडकाळ बना. या परप्रांतीयांना धडा शिकवा. आज आपल्यासारखी परिस्थिती इतर राज्यात नाही. इतर राज्यांमध्ये आपल्याच माणसाची बाजू तिथली राज्य सरकारे, पोलीस यंत्रणा घेत असतात. फक्त आपल्या माणसाची परिस्थिती आहे. आपलीच लोक परप्रांतीयांना प्रोत्साहन देत आहेत. हे पूर्णत: चुकीचे आहे. त्यामुळे जर आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर आपल्या या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना गप्प बसता कामा नये. मी आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तुमच्या पाठीशी उभी आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)