शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

माविमच्या ‘तेजस्विनी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: October 30, 2015 23:39 IST

कार्याचा गौरव : २० देशांतील ५६ प्रकल्पांमधून निवड; समानता विषयाला अनुसरून पसंती

रत्नागिरी : बचत गटाच्या माध्यमांतून राज्यभर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्या सर्वंकष विकासासाठी कार्यरत असलेल्या, महाराष्ट्र शासनाची महिला विकासाची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाला अर्थात ‘माविम’ला आंतरराष्ट्रीय आयफॅड संस्थेचा ‘समानता पुरस्कार २०१५’ घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक दीपक भागवत यांनी ‘लोकमत’ला दिली. २० देशातील ५६ प्रकल्पांमधून माविमच्या ‘तेजस्विनी’ प्रकल्पाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयफॅड ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.दारिद्र्यनिर्मुलन, कृषी विकास व महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत ९९ देशांमध्ये १८५ प्रकल्प सुरू आहेत. यावर्षी या संस्थेने एशिया पॅसिफिक या विभागातून हा पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार ‘समानता’ या विषयावर सातत्यपूर्ण काम करणाऱ्या प्रकल्पाला देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार माविमने केलेल्या भरीव कार्याची दखल घेत हा पुरस्कार देऊ केला आहे. या नामनिर्देशनासाठी माविमच्या तेजस्विनी कार्यक्रमाची निवड करण्यात आली आहे, असे दीपक भागवत यांनी सांगितले.माविम सहायत तेजस्विनी या कार्यक्रमाची अंमलबजावणी गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील ३३ ग्रामीण जिल्ह्यांमध्ये करीत आहे. या वाटचालीत माविम जिल्हा यंत्रणा, लोकसंचालित साधन केंद्राची संपूर्ण कार्यकारिणी, स्वयंसहाय बचत गटातील महिला सभासद, सर्व लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, लेखापाल व सहयोगिनी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मुंबई मुख्यालय माविमच्या उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे माविमच्या चळवळीला अधिकच प्रेरणा मिळाली असल्याचे दीपक भागवत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बचत गटाच्या माध्यमातून राज्यभर महिलांसाठी कार्यरत.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सर्वंकष विकासासाठी कार्यरत.आयफॅड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून पुरस्काराची घोषणा.एशिया पॅसिफिक विभागातून पुरस्कार जाहीर.