शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

एकात्मता सायकल अभियान २८पासून होणार

By admin | Updated: October 16, 2014 00:06 IST

राष्ट्रसेवा दल, सांगलीचे १५वे राष्ट्रीय सायकल अभियान

जाकादेवी : राष्ट्रसेवा दल, सांगलीचे १५वे राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान २८ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचे दि. ३० रोजी जाकादेवीत आगमन होणार आहे. राष्ट्रसेवा दल व सानेगुरुजी प्रतिष्ठान, सांगली - मिरजतर्फे प्रतिवर्षी १० दिवसांचे मोफत निवासी शिबिर घेण्यात येते. राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान, डिसेंबरमध्ये सात दिवसांचे ‘श्यामची आई’ ग्रंथ पारायण कार्यक्रम होतात. मलकापूर - वारुळ - आंबा - खडीकोळवण - मारळ - हातीस - मार्लेश्वर मातृमंदिर देवरुख , संगमेश्वर - कर्णेश्वर मंदिर, डिंगणी - फुणगूस - जाकादेवी - चाफे, मालगुंड , मालगुंड ते जयगड व समुद्र किनारामार्गे रत्नागिरी नवनिर्माण कॉलेज, रत्नागिरी - पाली - नाणीज - साखरपा - आंबा अंबेश्वर हायस्कूल आंबा, मलकापूर - बांबवडे - बोरपाडले - यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अ‍ॅकॅडमी, कोडोली,- वाठार - पेठ वडगाव, हातकणंगले - जयसिंगपूर - अंकली - मिरज येथे सायंकाळी अभियानाची सांगता करण्यात येईल.सुमारे ४५० ते ५०० किलोमीटरच्या या सायकल अभियानात १२ वर्षांच्या मानसी नागराळेपासून ८० वर्षे वयाच्या डॉ. रामचंद्र शांत व ७५ वर्षाच्या विमल शांत यांच्यासह सुमारे ५० ते ६० सायकलस्वार सहभागी होणार आहेत. सदाशिव मगदूम, रमेश हेगाणे, दिनकर आदाटे या अभियानाचे नेतृत्व करणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाज जागृती करणार असून, स्थानिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाच्या संयोजकांमार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)