शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निधीची तपासणी करा

By admin | Updated: July 29, 2014 23:00 IST

परूळेकर यांची मागणी : दीपक केसरकरांवर टीका

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रातून जो निधी आणून विकास केला, तो निधी कधी आणि कुठे खर्च झाला याची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी केली आहे. तसेच विठ्ठल कामतांसारखा चांगला उद्योजक सावंतवाडीतून का गेला, याचा शोधही जनतेने घ्यावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. परूळेकर म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांना अचानक दहशतवाद दिसायचा बंद कसा झाला? असा सवाल करून, ते ज्या शिवसेनेत चालले आहेत, त्या शिवसेनेबाबत त्यांनी केलेली वक्तव्ये आम्ही लवकरच बाहेर काढू, असे सांगितले. आमदार केसरकर हे नारायण राणे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार होते. त्याचे काय झाले, याचेही उत्तर केसरकरांनी द्यावे आणि लवकरात लवकर हा दावा दाखल करावा. म्हणजे आम्हाला सर्व पुरावे समोर आणता येतील, असे डॉ. परूळेकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीचा विकास केला अशी बतावणी करणाऱ्या केसरकर यांनी केंद्राचा निधी कुठे आणि कसा खर्ची घातला, याचे उत्तर द्यावे. पालिकेच्या अनेक प्रकल्पांवर निधी खर्ची घातला. पण त्याचा पुढे काय उपयोग झाला? यात मोठ्या प्रमाणात अनियमिता दिसून येत आहे, असा आरोप करून या सर्व निधीची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. परूळेकर यांनी केली. यावेळी डॉ. परूळेकर यांनी, सावंतवाडीच्या विकासाबाबत काही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, हा तलावाभोवतीचा विकास आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याबाबत कुणाला काळजी नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच ज्याने संपूर्ण देशात शेकडो हॉटेल्स उभारली, त्या विठ्ठल कामतांसारख्या उद्योजकाने सावंतवाडी व वेंगुर्ले येथून काढता पाय का घेतला, याचा शोधही येथील जनतेने घ्यावा, अशी मागणीही केली. (प्रतिनिधी)