शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांची माहिती होणार कॅमेराबद्ध

By admin | Updated: December 20, 2014 23:24 IST

तीन शाळांची निवड : आंबोलीतील विद्यार्थ्यांकडून प्रकल्पास सुरुवात

आंबोली : भारत, मॅक्सिको व अमेरिका या तीन देशांमध्ये वन्यजीवांविषयी जनमानसात जागृती, आवड निर्माण व्हावी म्हणून अमेरिका व मॅक्सिकन प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या तिन्ही देशांमध्ये प्रथमत: सस्तन प्राण्यांविषयी माहिती शाळकरी मुलांकडून स्वयंचलित कॅमेरा (कॅमेरा ट्रॅप) या माध्यमातून संकलित करण्यासाठी भारतातील तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने आंबोलीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.यात आंबोलीतील युनियन इंग्लिश स्कूल आंबोली, राजापूर येथील अणसुरे विद्यालय, नागपूर रामटेकमधील जनसेवा हायस्कूल पवनी यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी तिन्ही शाळांचे शिक्षक प्रतिनिधी तसेच या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक तथा संशोधक राहूल खोत, संजय करकरे, आंबोली शाळेचे मुख्याध्यापक विनायक खानोलकर, अभ्यासक हेमंत ओगले, प्रसाद गावडे, संजय मांडवकर, संजय धोटे, पुणे येथील पर्यावरण अभ्यासक साईली पालांडे- दातार, काका भिसे, शुभम आळवे, या प्रकल्पाच्या मुख्य संयोजिका ज्या अमेरिका येथून या कार्यशाळेत मार्गदर्शन व कॅमेरा ट्रॅप लावणे व त्यांचे निरीक्षण व नोंदी लिहिणे या सर्वांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे यासाठी आलेल्या स्टेफनी शेटलर, आंबोली वनक्षेत्रपाल ए. बी. तेअरे, डॉ. अंकुर पटवर्धन हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपली मते मांडली व प्रकल्पाच्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या कार्यशाळेत स्वयंचलीत कॅमेरे जंगलात लावावे. या कॅमेऱ्याच्या समोरून कोणताही प्राणी गेल्यास तो कॅमेरा कसा फोटो काढतो, काढलेला फोटो कसा तपासणे, त्याची नोंद कशी करणे या विषयी मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. (प्रतिनिधी)