शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या स्वतंत्र भूमिकेने प्रश्न रखडले

By admin | Updated: January 4, 2016 00:51 IST

राजन तेलींचा आरोप : एकनाथ खडसे लवकरच जिल्ह्यात येणार

कणकवली : आचरा देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न आणि मच्छिमारांतील वाद याबाबत मंत्रीस्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असताना आमदार वैभव नाईक यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने प्रश्न सुटण्यास वेळ लागत आहे. लवकरच याप्रश्नी महसूलमंत्री एकनाथ खडसे सिंधुदुर्गात येणार असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस राजन तेली यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. राजन तेली म्हणाले की, आचरा देवस्थान इनाम प्रश्न अनेक वर्षे रखडलेला आहे. या प्रश्नावर आंदोलन झाले तेव्हा मी आंदोलकांना भेटलो होतो. जुलै महिन्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे माधव भांंडारी, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह मी हा प्रश्न घेऊन गेलो. त्यांनी याबाबत संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक लावण्याचे निश्चित केले. मात्र, आमदार वैभव नाईक त्यानंतर राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. दोन पक्षांतील वाद लोकांसमोर येऊ नये यासाठी राज्यमंत्र्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहिली. त्या बैठकीसाठी काही ग्रामस्थांसह मीही गेलो. परंतु, दुर्दैवाने ती बैठक होऊ शकली नाही. आता मी महसूलमंत्र्यांना आचरा तसेच त्यासारखे काही देवस्थानांचे प्रश्न सोडविण्यास मदत करण्याची विनंती केली आहे.अशाच प्रकारे मच्छिमारांतील वादातही नाईक यांनी समन्वय न साधता वेगळे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पर्ससीन व पारंपरिक मच्छिमारांतील वादात कायमस्वरूपी निर्णय व्हावा म्हणून गणेशोत्सवापूर्वी पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळासह मी माधव भांडारी, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, विकी तोरसकर, महेंद्र पराडकर आदी मंडळींच्या उपस्थितीत महसूलमंत्री खडसे यांच्याबरोबर मुंबईत बैठक झाली. पुन्हा पुन्हा घुसखोरी करणाऱ्यांवर टाडासारखा गुन्हा नोंदविण्यात यावा, गस्तीनौकांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी, आदी सूचना केल्या. या बैठकीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यास मंत्रीमहोदयांनी तत्त्वत: मान्यता दिली. मात्र, आमदार वैभव नाईक हे दोनच दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना शिष्टमंडळ घेऊन भेटले. (प्रतिनिधी)समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांबाबत समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज असून, कोणीही राजकारण आणू नये. याबाबत महसूलमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून, त्यापूर्वी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे, असे राजन तेली यांनी सांगितले.