शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

देवगडमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारला

By admin | Updated: July 31, 2014 23:31 IST

शिक्षण विभागाचे प्रयत्न : २१९ शाळांना मिळाला ‘ब’ व ‘क’ दर्जा

पुरळ : ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या मुल्यांकनानुसार शाळांची गुणवत्ता ठरवली जाते. शाळांमधील सोयीसुविधा, शाळेची इमारत शैक्षणिक दर्जा या गोष्टींची तपासणी करून २०० गुण दिले जातात. या वर्षीच्या मूल्यांकनामध्ये देवगड शिक्षण विभागाने भरारी घेऊन २२४ शाळांमधून २१९ शाळांना मूल्यांकनात ब व क दर्जा मिळाला आहे. गतवर्षीच्या मूल्यांकनापेक्षा या वर्षीच्या मूल्यांकनामध्ये शाळांचा दर्जा वाढला असून देवगड शिक्षण विभागाने परिश्रम घेऊन ही गुणवत्ता प्राप्त केली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्वक शिक्षक आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ग्रामविकास विभागाने पुढाकार घेऊन एक कार्य गटाची स्थापना केली होती. या कार्य गटाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे २०० गुणांवर मूल्यांकन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यात भौतिक सुविधांना ३५ गुण, शालेय व्यवस्थापनाला ६५ गुण आणि अध्ययन आणि अध्यापन यासाठी १०० गुण देण्यात येतात. त्यानुसार संबंधित शाळांना अ, ब, क, ड, इ अशी श्रेणी देण्यात येते. मिळालेली श्रेणी शाळेच्या बाहेर फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. माजी गटशिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी देवगड शिक्षण विभागाला प्रगतीच्या दृष्टीकोनातून एक विशिष्ट वळणावर नेले आहे. देवगड तालुक्यामध्ये यावर्षी अ मूल्यांकन मिळाला नसला तरी पुढीलवर्षी होणाऱ्या मूल्यांकनामध्ये अ दर्जाच्या शाळा जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असा मानस देवगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी व्यक्त केला आहे. मोफत गणवेश वाटपही तालुक्यातील शाळांमध्ये जुलैमध्येच १०० टक्के करण्यात आले आहे. पंचायत समितीने यशवंत ग्रामसमृद्धी योजनेमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून देवगडचे नावलौकीक केले आहे. शिक्षण विभाग शैक्षणिक दर्जा उंचावत मानांकन मिळविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करीतआहेत. (वार्ताहर)डोंगर कपारीत विस्तार-देवगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा २२४ आहेत. देवगड तालुक्याचा विस्तार हा डोंगर व खेड्यापाड्यात विस्तारलेला आहे. -अशा ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये प्रगती घडून देवगड शिक्षण विभागाने आपला शिक्षण विभाग प्रगतशीलतेच्या मार्गावर नेला आहे. -राज्यामध्ये अ मूल्यांकन मिळालेल्या शाळा १५९९ आहेत.-तर १४ हजार ९१८ शाळांना ब मूल्यांकन मिळाले आहे. अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगती करून १०० टक्के मुले प्रगत करण्याचेही काम या विभागाने चोख केले आहे.