शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

नाट्यगृहाची उपेक्षा : कोकणातील पहिल्यावहिल्या सांस्कृतिक केंद्राला मोकळा श्वास मिळेल ?

By admin | Updated: February 4, 2015 23:54 IST

सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडण्याचे प्रयत्न

सुभाष कदम - चिपळूण शहर हे कोकणातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. नटवर्य डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमीत कोकणातील पहिलेवहिले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र १९८५-८६ मध्ये सुरू झाले. परंतु, आज या नाट्यगृहाची उपेक्षा झाली आहे. गेली १० वर्षे दुरुस्तीच्या चक्रव्युहात अडकलेल्या या नाट्यगृहाला आता मोकळा श्वास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर तशा जोरदार हालचाली सुरू असून, येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया होणार आहे. माजी नगराध्यक्ष श्रावणशेठ दळी यांच्या पुढाकाराने या नाट्यगृहाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बुरटे यांच्या कारकीर्दीत या नाट्यगृहाचा प्रथम पडदा उघडला. वास्तुविशारद सुभाष आठल्ये आणि ठेकेदार भागवत, दाभोळकर आणि कंपनी यांनी या इमारतीचे काम केले. त्यावेळी प्रशासक म्हणून, आत्माराम प्रधान व त्यानंतर मुख्याधिकारी अरुण पानसे यांनी हे काम पूर्णत्त्वास नेले. श्रीनिवास गायकवाड हे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ नाही. येथील नगर परिषदेने बांधलेले एकमेव असे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दुरुस्तीअभावी धूळखात पडले आहे. सन २००५मध्ये आलेल्या महापुरात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पाणी शिरले आणि केंद्राची दुवस्था झाली. ही इमारत धोकादायक स्थितीत असून, गेली १० वर्षे हे केंद्र बंद आहे. अन्य करमणूक केंद्र नसल्याने करमणुकीच्या विविध कार्यक्रमांपासून रसिकांना वंचित राहवे लागत आहे. ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल आल्याने, हे केंद्र गेली अनेक वर्षे बंद आहे. या केंद्राच्या दुरूस्तीसाठी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. या केंद्राची अंतर्गत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ठाणे येथील एका कंपनीने कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सहमती दर्शविली होती. परंतु, मागील दोन्ही सभांना संबंधित ठेकेदार अथवा त्याचा प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने हे काम आता रखडले आहे. तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याने, आता या इमारतीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातले असून, हे सांस्कृतिक केंद्र पुन्हा डौलाने उभे राहवे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.सांस्कृतिक राजधानी म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या चिपळूणमध्ये सांस्कृतिक केंद्र होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पाऊले पडत आहेत. सांस्कृतिक केंद्र हे चिपळूणकरांसाठी भूषणावह गोष्ट आहे. या केंद्रासाठी अंदाजे ५ कोटी रूपये खर्च होणार असून, वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून निधी खर्च करुन मार्चअखेर या केंद्राचे काम सुरु होणार आहे. यापूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने आकाश थिएटर, ओंकार नाट्यसंस्था, चौकट ग्रुप, स्वेअर थिएटर, समर्थ इंटरटेनमेंट आदी संस्थांनी नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने संपर्क केला आहे. हे केंद्र दुरुस्त करण्याबाबत नगर परिषद प्रयत्न करत आहे, असे आश्वासन देऊन दोन वर्षे झाली तरी केंद्राच्या दुरुस्तीस दिंरंगाई का होत आहे? असा प्रश्न आता सतावत आहे.‘आम्ही चिपळूणकर’ नावाने नव्याने स्थापन झालेली एक संघटना या सांस्कृतिक केंद्रासाठी पुढे आली आहे. युवराज मोहिते, राजन इंदुलकर, संजीव अणेराव, रमाकांत सकपाळ, राजू जाधव आदी मंडळींनी नगराध्यक्षांबरोबर याविषयी चर्चा केली. सांस्कृतिक केंद्राबाबतची वस्तुस्थिती व नगर परिषदेची भूमिका समजून घेतली. त्यानंतर हे सांस्कृतिक केंद्र दुरुस्त करुन जनतेसाठी खुले व्हावे, यासाठी लोकशाही मार्गाने लढा लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याचा एक भाग म्हणून चिपळूणच्या विकासासाठी लोक चळवळ सुरु केली आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राबाबत नगर परिषदेने नकारात्मक व बोटचेपी भूमिका घेतली आहे. हे केंद्र आम्हाला ताबडतोब अद्ययावत करुन हवे आणि आम्ही ते करुन घेणारच, असा या चळवळीचा नारा आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आल्याने, अंतर्गत सजावट व काम पूर्ण होऊन, पुन्हा एकदा सांस्कृतिक केंद्राचा पडदा लवकरच उघडणार आहे.नगर पालिकेने कोकणात पहिलेवहिले नाट्यगृह चिपळूण येथे सुरु केले. परंतु, २००५ पासून हे नाट्यगृह बंद असल्याने येथील नाट्यप्रेमींची घोर निराशा झाली आहे. नगर परिषदेचे पदाधिकारी याबाबत पाठपुरावा करत आहेत. परंतु, शासन स्तरावर फाईलचा झालेला घोळ आणि इतर कारणं न पटणारी आहेत. इच्छाशक्ती ठेवून चिपळूणकरांची करमणूक करण्यासाठी हे सांस्कृतिक केंद्र लवकरात लवकर सुरु होणे ही काळाची गरज आहे. - दीपक कदम, पेठमाप, चिपळूणदि.८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक केंद्रासमोर मोकळ्या वातावरणात पारावरचा लोकोत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात चिपळुणातील अनेक कलाकार आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. कला, नाट्यक्षेत्रातील काही नामवंत कलाकरांनाही यावेळी बोलवण्याचा प्रयत्न आहे.सध्या सांस्कृतिक केंद्राची अवस्था अतिशय दयनीय आहे. रंगमंचाची मोडतोड झाली आहे. फॅन, साऊंड सिस्टीम, मेकअप रुम बरोबरच एसी व इतर वस्तूंची मोडतोड झाली आहे. येथे नव्याने खुर्च्या बसवाव्या लागणार आहेत. तर सेटही नव्याने उभारावा लागणार आहे. पुन्हा एकदा कात टाकून, हे केंद्र नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.चिपळूणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी शासनाने एवढी गुंतवणूक करुन एक सुंदर इमारत बांधली. ती पुन्हा दुरुस्त होऊन त्याचा आनंद जनतेला घेऊ द्या. शासन स्तरावर जर काही अडचणी येत असतील, तर जनतेला बरोबर घेऊन नगर पालिकेने आंदोलन करायला हवे. पण, निखळ मनोरंजनासाठी सांस्कृतिक केंद्राची इमारत लवकरात लवकर सुरु होणे गरजेचे आहे. - रमाकांत सकपाळ, चिपळूण