शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

वाहतूक कोेंडी : व्यापाऱ्यांना बसण्यास जागा नाही

रामचंद्र कुडाळकर- तळवडे -वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे बाजारपेठ ही सावंतवाडी संस्थान काळापासून सुरू झालेली बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडा बाजार भरतो; परंतु आठवडा बाजारादिवशी होणारी वाहतूक कोंडी, व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता, ग्राहकांच्या सोयीसुविधांची वानवा आदी अनेक समस्यांमुळे होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. आठवडा बाजार म्हटला की, ग्रामीण भागातील लोकांच्या खरेदी-विक्रीचा, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा दिवस. संस्थानकाळापासून अस्तित्वात असलेल्या होडावडा बाजारपेठेत होडावडे दशक्रोशीतील लोक खरेदी-विक्री तसेच शेतीतून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी येतात. आठवडा बाजारामुळे ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येतात. होडावडे बाजारपेठ ही जरी लहान असली, तरी मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे या गावाचे आणि ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे. मातोंड, पेंडुर, नेमळे, वजराठ, तळवडे, तुळस, पाल, अणसूर-पाल, निरवडे, न्हावेली तसेच कोल्हापूर, बेळगाव आदी भागांतूनही लोक येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. वाहतूक कोंडीहोडावडे आठवडा बाजारात दशक्रोशीसह परगावातूनही लोक येत असल्यामुळे येथे व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांची गर्दी होते. परंतु जागेअभावी दुकानदारांची अर्धिअधिक दुकाने रस्त्यावर येत असल्याने आठवडा बाजारादिवशी येथे वाहतूक कोंडीही नेहमीचीच समस्या झाली आहे. त्यातच ही बाजारपेठ सावंतवाडी-वेंगुर्ले रस्त्यानजीकच असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचीही त्यात भर पडते. याचा त्रास ग्राहकांना आणि वाहनचालकांनाही सहन करावा लागतो. यासाठी विक्रेत्यांना ठराविक जागेत दुकान थाटण्यासाठी निर्बंध लादणे महत्त्वाचे आहे. आठवडा बाजार वगळता ग्राहकांची वानवाहोडावडे बाजारपेठेत काळानुरूप बदल होत असला, तरी मंगळवारचा आठवडा बाजार सोडून इतर दिवशी येथे ग्राहकांचे प्रमाण फारच कमी असते. याचा फटका दुकानदार, व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग वाढविण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासकीय योजनांचा फायदा घेऊन तसेच ग्रामपंचायत आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. जागेची अनुपलब्धता होडावडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता भासत आहे. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी येणारे व्यापारी, दुकानदार आपली दुकाने रस्त्याच्या दुतर्फा थाटतात. यातून काहीवेळा दुकानदारांमध्ये आपापसात वाद-भांडणेही उद्भवतात. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे जागेच्या व्यवस्थापनाबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन गरजेचे आठवडा बाजाराला येणारे भाजी तसेच अन्य विक्रे ते कचरा तसाच टाकून जातात. त्यामुळे स्वच्छता निर्माण होते. यासाठी बाजारादिवशी सायंकाळी सर्व विक्रेत्यांनी आपापला कचरा कचराकुं डीत टाकण्याची सक्ती करणे आवश्यक आहे.