शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकणाने रचला इतिहास; सलग तिसऱ्या वर्षी राज्यात अव्वल

By admin | Updated: June 18, 2014 00:57 IST

दहावीचा ९५.५७ टक्के निकाल : कोकण बोर्डात सिंधुदुर्ग पहिला, तर रत्नागिरी दुसरा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण निकाल ९५.५७ टक्के लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा कोकणच अव्वल ठरला आहे. स्थापनेपासूनच्या सलग तिसऱ्या वर्षी दहावी आणि बारावी अशा दोन्ही निकालांमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवून कोकणाने इतिहास रचला आहे. यात दरवेळेप्रमाणे याहीवेळी मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूर मंडळाचा निकाल ९३.८३ टक्के, तर तिसऱ्या क्रमांकावरील पुणे मंडळाचा निकाल ९२.३५ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचे विभागीय अध्यक्ष बी. पी. कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विभागाच्या निकालाविषयी माहिती दिली. यावेळी सचिव किरण लोहार, सहायक सचिव चंद्रकांत गावडे, उपशिक्षणाधिकारी डी. एस. पवार, सिंधुदुर्ग विस्तार अधिकारी पी. पी. मांजरेकर, लेखाधिकारी उत्तम शिंदे उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून ४१ हजार ५५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी ३९ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागात २१ हजार ८३५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यांपैकी २० हजार ७१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.८८ टक्के इतके आहे. विभागात १९ हजार ७१७ मुली प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी १८ हजार ९९४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३३ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १.४५ ने अधिक आहे. (प्रतिनिधी)