शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा मृतदेह कोंडून ठेवला

By admin | Updated: June 20, 2014 00:15 IST

मळगाव येथील घटना : सात दिवसांनी प्रकार उजेडात

सावंतवाडी : मळगाव-आजगावकरवाडी येथे एका घरात कुजलेल्या अवस्थेत वृद्धाचा मृतदेह आढळून आला. वसंत बाळकृष्ण वालावलकर (वय ७५) या वृद्धाचा आठवड्यापूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता, पण त्याच्या वेडसर मुलगा व मुलगीने हा मृतदेह खोलीत कोंडून ठेवला. अखेर हा प्रकार सात दिवसांनी विवाहित मुलीमुळे उघड झाला. या घटनेमुळे मळगाव गावात एकच खळबळ उडाली आहे.मळगाव-आजगावकरवाडीत वसंत बाळकृष्ण वालावलकर हे आपला मुलगा व तीन मुलींसह राहत होते. त्यातील एका मुलीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पत्नीचाही मृत्यू झाला होता, तर एका मुलीचा विवाह झाला आहे. मुलगा रमाकांत वसंत वालावलकर व मुलगी शांती वसंत वालावलकर हे दोघेजण वडिलांसह आजगावकरवाडीतील घरात राहत होते.मात्र, गेले काही दिवस वसंत वालावलकर हे अस्थमाच्या आजारपणामुळे त्रस्त होते. त्यातच १२ जूनला मळगाव बाजारात जाताना ते अनेकांना दिसले होते. सायंकाळी घरी गेल्यानंतर मात्र ते कोणालाही दिसले नाहीत. याच कालावधीत ते सकाळच्या सुमारास तोंड धुण्यासाठी आले असता अंगणात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा व मुलगीने त्यांचा मृतदेह घरातील एका खोलीत कुलूपबंद करून ठेवला होता. काही दिवसांपूर्वीच वालावलकर यांनी घराशेजारची झाडे तोडून विकली होती. ती झाडे विकून मिळालेल्या पैशांतून त्यांना घर बांधायचे होते. त्यामुळे लाकडाचा व्यापारी पैसे देण्यासाठी त्यांची शोधाशोध करीत आला होता. यावेळी वालावलकर कुठे दिसत नाहीत, असे शेजाऱ्यांना सांगितल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. वालावलकरांच्या शोधासाठी सावंतवाडीतील त्यांचे नातेवाईक गोसावी यांनी वालावलकरांच्या गोवा, तसेच अन्य ठिकाणच्या नातेवाइकांना फोन करून चौकशी केली. मात्र, ते कुठेही नसल्याचे समजले. अखेर त्यांच्या साळगाव येथील विवाहित मुलीला बोलावून घेण्यात आले.साळगाव येथील मुलगी मळगाव येथील घरी आली असता तिला घरातून कुजलेला वास आला. यावेळी तिने भाऊ रमाकांतला खोली उघडण्यास सांगितले. मात्र, त्याने खोली उघडण्यास मज्जाव केला. त्यामुळे याबाबत सावंतवाडी पोलिसांत रितसर तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, उपनिरीक्षक दाजी वारंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोस्कर, संजय हुबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुलगा रमाकांतने पोलिसांसमक्ष खोली उघडली असता वालावलकर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह अन्यत्र हलविण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदनही केले. या प्रकरणी मृत वसंत वालावलकर यांची मुलगी पुष्पलता वालावलकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, मृतदेह ठेवण्यामागच्या कारणाचाही पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)