शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

अश्रू पुसण्याचा प्रयत्न : खरवते कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे औदार्य

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अभिनव ‘मदतगार’ उपक्रमाद्वारे ५१ हजार रुपयांचा निधी जमवून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे. या निधीचा धनादेश सोमवारी कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्याहस्ते ‘नाम’ संस्थेचे समन्वयक हरिष हितापे यांच्याकडे कृषी महाविद्यालय सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला.यावेळी डॉ. सुनीतकुमार पाटील, प्रा. गजानन आढाव, प्रा. हरिश्चंद्र भागडे, सुशील ससाणे उपस्थित होते. हितापे यांनी सांगितले की, आज कृषी क्षेत्रापुढे मोठे आव्हान आहे. शेतामध्ये पिकवलेल्या धान्याला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला आहे.आजच्या युवकांनी पुढे येत शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. हस्तांतर व रुपांतर करण्याने उद्योग मोठे झाले. परंतु, शेतामध्ये काबाडकष्ट करून धान्य पिकवणाऱ्याच्या मालाला भाव नाही. एकीकडे सातवा वेतन आयोग जाहीर होतो. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात. परंतु, ज्या कृषीक्षेत्रावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यांचे अर्थशास्त्र मात्र सरकारला कळत नाही. आत्ताचे सरकार हे उद्योग - धंदेवाल्यांचे आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात निधी जमवून शेतकऱ्याला मदत करावी लागते, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे तरुणांनी स्वयंप्रेरीत होऊन कृषी क्षेत्राला गतवैभव आणणे ही काळाची गरज आहे. यावेळी शेखर निकम यांनी सांगितले की, आपल्या ताटातील घास उपाशी जीवाला देऊन माणुसकी जपणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. सामाजिक बांधिलकीची भावना मनात ठेवून विद्यार्थ्यांनी राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. आपत्तीग्रस्त, पूरग्रस्तांसाठी यापूर्वीही संस्थेने मदतकार्य केले आहे. (वार्ताहर)