शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ खून मुलाकडूनच

By admin | Updated: June 28, 2015 23:29 IST

न्हावेलीतील घटना : कबुली दिली; संशयिताला अटक

सावंतवाडी : न्हावेली-विवरवाडी येथील पास्तू किस्तू फर्नांडिस (वय ५५) या वृद्ध पित्याचा खून संशयित म्हणून ताब्यात घेतलेला मुलगा सालू फर्नांडिस यानेच केल्याचे तपासात पुढे आले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या दोघांच्या झटापटीत सालू याने वडिलांना भिंतीवर आदळले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. सालू याला पोलीस आज, सोमवारी येथील न्यायालयात हजर करणार आहेत.न्हावेली-विवरवाडी येथील पास्तू फर्नांडिस यांचा शुक्रवारी रात्री गूढ मृत्यू झाला होता. या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नव्हते. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनानंतर पास्तू यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी शनिवारी मृत पास्तू यांचा मुलगा जॉकी फर्नांडिस याच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हाही दाखल केला होता. तसेच चौकशीसाठी पास्तू यांचा मोठा मुलगा सालू याला ताब्यात घेतले होते, पण रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते.शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास वडील पास्तू मद्यपान करून आले होते. त्यांनी सालूची गळपट्टी धरली. त्यावेळी दोघात झटापटही झाली होती. यात सालूने वडिलांना दरवाजावर आदळले. भिंतीवरही जोरदार आपटले. यात पास्तू यांच्या डोक्याला व तोंडाला जखम झाली. सकाळी उठून वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला असता वडील मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. मृत पास्तू यांना चार मुलगे व चार मुली असा परिवार असून, सालू हा सर्वांत मोठा मुलगा आहे, तर दुसरा मुलगा जॉकी हा गोव्यात कामाला असतो. मृत पास्तू यांची पत्नी आजारी असून ती घरातच आहे. पोलिसांनी सालू याला ताब्यात घेतले आहे. त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)रेड्यावरील उपचारावरून वादरविवारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी घटनेची कसून चौकशी करीत सालू याला पुन्हा ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपली वडिलांशी झटापट झाली होती, अशी कबुली दिली. चार दिवसांपूर्वी गोठ्यातील रेड्याला वडिलांनी धारदार हत्याराने मारले होते. त्यामुळे रेड्याच्या पायाला दुखापत झाली होती. सालू याने रेड्यावर उपचार करण्यासाठी वैदू आणला होता. या वैदूला वडिलांनी, तू रेड्याला बरा करू नकोस, मी त्याला पुन्हा मारणार, अशी धमकी दिली होती. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.