शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पदे घेताना घुसमट झाली नाही का?

By admin | Updated: February 2, 2015 23:48 IST

कॉंग्रेसचा पडतेंना सवाल : सदस्य संख्या बघूनच शिवसेनेत प्रवेशाचा आरोप

कुडाळ : काँग्रेस नेते नारायण राणे यांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय पडते यांना वेळोवेळी मोठी पदे, जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. तरीही पक्षात घुसमट होते, असे कारण सांगून ते बाहेर पडतात, हे आश्चर्य आहे. त्यांनी हा पक्षबदल कुडाळ ग्रामपंचायतीतील सदस्यांची संख्या बघूनच केला आहे, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी साळगावकर म्हणाले, काँग्रेस पक्षात घुसमट झाली असे म्हणणाऱ्या संजय पडते यांना नारायण राणे व पक्षाने एसटी महामंडळ संचालक, शिवसेना जिल्हाप्रमुख,जिल्हा परिषद अध्यक्ष, विधान सभा निवडणुकीत कुडाळ मतदार काँग्रेसचे प्रचारप्रमुख अशी पदे आणि मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. पक्षात नवीन आलेल्यांना सांभाळून घ्यावे लागते. जुन्यांनी त्याबाबत गैरसमज करू नये. येथील सरपंच दोन वर्षांनंतर बदलावा,हे अगोदरच ठरले होते. कालावधी संपल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सहा महिन्यांअगोदर राजीनाम्याचे तोंडी आणि नंतर लेखी आदेश कुडाळ सरपंचांना दिले होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ उपसरपंच विनायक राणे, आनंद शिरवलकर, सुनील भोगटे, विकास कुडाळकर, अस्मिता बांदेकर, अनिल खडपकर व काँगे्रेसचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)पडते यांनी अ‍ँब्युलन्स विकली : राणेसंजय पडते मित्र मंडळ स्थापन करून आमच्यासारख्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन जनतेसाठी विकत घेतलेली अ‍ॅम्ब्युलन्स पडते यांनी कोणालाही न सांगता विकली, असा आरोप विनायक राणे यांनी केला. हिंमत असेल, तर राजीनामा द्या : सुनील भोगटेजर खरोखरच घुसमट होत आहे तर सरपंचांनी आपल्या सरपंच व सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, असा टोला सुनील भोगटे यांनी हाणला आहे. कॉँग्रेसप्रमाणे शिवसेनेतही गटबाजी करून शिवसेनेलाही पडते वेठीस धरतील. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत कुडाळ नेरूर येथील आपले सदस्यत्व राखू न शकलेले संजय पडते शिवसेना काय राखणार, असा टोलाही सुनील भोगटे यांनी लगावला. पडते यांच्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीच घुसमट होत होती. ती आता संपली आहे, असे विकास कुडाळकर यांनी सांगितले. मला तालुकाध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी संजय पडते यांनी नारायण राणे यांना सांगितले होते, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.