शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

हापूस आंबा पडणार लांबणीवर!

By admin | Updated: December 3, 2015 23:50 IST

हवामानात बदल : कलमे पालवीने बहरली; बागायतदार, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

प्रसाद बागवे -- कुणकेश्वर-आंबा उत्पादनात ‘देवगड’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. किंबहुना आंबा उत्पादनात देवगड तालुका नेहमी अग्रेसर असतो. तसेच विविध बाजारपेठांत हापूसला चांगली मागणी असते; परंतु चालू वर्षी डिसेंबर उजाडला तरी कलमांना मोहोर नाही. प्रतिवर्षी कलमांना सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात मोहोर येऊ लागतो. परंतु बदलत्या हवामानामुळे आंबा पिकासाठी पोषक हवामान तयार होत नसल्यामुळे तालुक्यातील आंबा बागायतदार व व्यावसायिक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. गतवर्षी आंबा बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते.त्यामध्ये अवकाळी झालेला पाऊस, तुडतुडा, ध्रिप्ससारख्या रोगांवर न होणारा औषधांचा परिणाम तसेच पावसामुळे आंब्यावर आलेले काळे डाग आदी कारणांमुळे आलेला अवाढव्य खर्च यामुळे अगोदरच गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या डोेक्यावर आहे. तरीसुद्धा निसर्ग साथ देईल या आशेने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. विशेषकरून दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीला दोन दिवस वातावरणात गारवा मोठ्या प्रमाणात झाला होता. परंतु लगेच वातावरणात पुन्हा बदल झाला. त्याचा परिणाम पिकावर होताना दिसून येतो. संपूर्ण तालुक्यात कलमांनी पालवी धारण केल्याचे चित्र दिसते. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक लवकर हातात येण्यासाठी कल्टारचा वापर करूनही कलमांना अजून मोहोर आलेला नाही. त्यामुळे आंबा पीक हाती येण्याआधीच नुकसानीची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. अजून मोहोर नसल्याने आंबा पिकाचा पहिला टप्पा संपला आहे.जर येत्या काही दिवसांत थंडी वाढली तर कलमे एकाचवेळी मोहोर धारण करतील व एकाचवेळी उत्पादन झाल्याने आंबा तोडणीमध्ये टप्पे करता येणार नाही.परिणामी एकाचवेळी उत्पादन झाल्यामुळे विक्रीचे दरही घसरण्याची भीतीही बागायतदार व अडतदार यांच्यामधून व्यक्त होत आहे. गतवर्षी झालेले नुकसान व यावर्षीही सुरुवातीस होणारी कसरत यामुळे शेतकरी उदास झाला असून निसर्गाकडे याचना करत आहे.