शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात १२ रोजी अपंगांसाठी शिबिर

By admin | Updated: January 4, 2016 00:53 IST

आमदार वैभव नाईक : ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग व्यक्तींची होणार तपासणी

मालवण : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुक्यातील अपंग व्यक्तींसाठी १२ जानेवारीला १० ते ५ या वेळेत ग्रामीण रुग्णालय येथे शिबिर घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात प्रथम सिंधुदुर्गातच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यानंतर आवश्यक कृत्रिम अवयव, साधने उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मालवणात अपंगांसाठी घेण्यात येणाऱ्या शिबिराच्या नियोजनासाठी आमदार वैभव नाईक मालवणात आले होते. शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख नंदू गवंडी, उदय दुखंडे, शिवा भोजने, श्वेता सावंत, बाबा सावंत, सुभाष धुरी, संतोष घाडी, किरण वाळके, मेघा सावंत, रश्मी परुळेकर, चारुशीला आचरेकर, शर्मिला गावकर, रामू सावंत, डॉ. गोपाळ सावंत, तुकाराम, आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, तालुक्यात ४८८ अपंग बांधव नोंदणीकृत आहेत. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. तपासणी केल्यानंतर ज्यांना कृत्रिम साधनाची आवश्यकता भासणार, त्यांना केंद्र शासनाच्यावतीने पुरविले जाणार आहे. ज्यांना अपंग असलेल्याचा दाखला मिळाला नाही, त्यांनाही तो उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त अपंग बांधवांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन नाईक यांनी केले. यावेळी आचरा, हिवाळे विभागाच्या उपतालुकाप्रमुखपदी किर्लोस येथील बाबा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)