शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

देवगडात पालकमंत्र्यांचा काँग्रेसकडून निषेध

By admin | Updated: October 24, 2015 23:31 IST

मंत्रालय बैठक : स्थानिक आमदारांना बोलावले नसल्याने नाराजी

देवगड : देवगडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात बैठक लावली. मात्र, ती केवळ दिखावा असून स्थानिक आमदारांना या बैठकीला बोलावले नाही. या कृतीचा देवगड तालुका काँग्रेसने निषेध नोंदविला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देवगडचा पाणीप्रश्न ज्वलंत आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यात लक्ष घालून तो सोडविण्याची गरज होती. मात्र, तो प्रलंबित ठेवला. शासनस्तरावर या प्रश्नासाठी केवळ श्रेय घेण्यासाठी स्थानिक आमदार नीतेश राणे यांना बोलावले जात नाही. वास्तविक, पाणीप्रश्नात राजकारण आणू नका, पाणीप्रश्न हा जनतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे वारंवार आमदार नीतेश राणे म्हणाले आहेत. असे असताना पालकमंत्री दीपक केसरकर हे यामध्ये श्रेयवादाचे राजकारण आणत आहेत. मुळातच पालकमंत्री केसरकर व प्रमोद जठार यांना पाणीप्रश्न कळलेलाच नाही. पालकमंत्री केसरकर हे तिलारीहून पाणी आणण्याची योजना आखत आहेत, तर प्रमोद जठार नाधवड्याच्या धरणावरून पाणी आणू, असे सांगत होते. आता शासन आल्यावर याबाबत काहीच बोलत नाहीत. कोणत्याही उपायाने पाणी आणा अशी देवगडच्या जनतेची भूमिका आहे. यासाठी आमदार नीतेश राणे यांनी तातडीने या गावांसाठी पाणी योजना करा, अथवा पाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी पैसे द्या, अशी भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका योग्य आहे. काँग्रेसचे आंदोलन श्रेयवादासाठी नाही, तर पाणी मिळावे यासाठी आहे. ज्या ज्या पातळीवर आंदोलन केले पाहिजे ते करून पाणी मिळेपर्यंत सरकारला धारेवर धरण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबाबत आता आमदार नीतेश राणे यांनी रणशिंग फुंकले असून ६ नोव्हेंबरला ‘आर या पार’ची लढाई काँग्रेस लढणार आहे. (प्रतिनिधी)